नागराज मंजुळेच्या लग्नाचे फोटो तुम्ही पाहिले का?, काडीमोड घेतलेयानंतर काय करते त्याची पत्नी जाणून घ्या.......

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2019 06:00 IST2019-08-28T06:00:00+5:302019-08-28T06:00:00+5:30

अत्यंत साध्या पद्धतीने या दोघांचा विवाह संपन्न झाला. त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. यातील एका फोटोत लग्न पार पडल्यानंतर नागराज आणि सुनीता खुर्चीवर बसलेले दिसत आहेत.

Have u seen Nagraj Manjule’s wedding photo…? Know what his wife doing after divorce | नागराज मंजुळेच्या लग्नाचे फोटो तुम्ही पाहिले का?, काडीमोड घेतलेयानंतर काय करते त्याची पत्नी जाणून घ्या.......

नागराज मंजुळेच्या लग्नाचे फोटो तुम्ही पाहिले का?, काडीमोड घेतलेयानंतर काय करते त्याची पत्नी जाणून घ्या.......

मराठी चित्रपटसृष्टीत शंभर कोटींची कमाई करून नवा इतिहास रचणारा चित्रपट म्हणजे सैराट. नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटाने रसिकांना जणू काही याड लावलं. सैराटसह नागराजच्या 'पिस्तुल्या' ही शॉर्टफिल्म आणि फँड्री चित्रपटावरही रसिकांनी भरभरून प्रेम केलं आणि पसंती दिली. एक संवेदनशील दिग्दर्शक अशी नागराजची ओळख बनलीय. एकीकडे दिग्दर्शक म्हणून नाव होत असताना नागराजच्या वैयक्तीक आणि वैवाहिक जीवनाविषयी जाणून घेण्याची रसिकांना उत्सुकता असते. १७ मे १९९७ साली नागराजचे सुनीतासह लग्न झाले. अत्यंत साध्या पद्धतीने या दोघांचा विवाह संपन्न झाला. त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. यातील एका फोटोत लग्न पार पडल्यानंतर नागराज आणि सुनीता खुर्चीवर बसलेले दिसत आहेत. 


दुसऱ्या एका फोटोत नागराज पत्नी सुनीताला घरात गेल्यानंतर मिठाई भरवत असल्याचे दिसत आहे. यांत नागराज आणि सुनीता आनंदी असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र त्यांचा सुखी संसार फार काळ काही टिकला नाही. दोघांच्या संसारातील अनेक वादविवाद उफाळून येऊ लागले. अखेर २०१४ साली कागदोपत्री ते विभक्त झाले. 


विभक्त झाल्यावर सुनीता पुण्याच्या चिंचवड भागातील रामनगर परिसरात राहतात. पोटगी घेऊन जे पैसे मिळाले त्या पैशात सुनीता आपले गुजराण करू लागल्या. मात्र पुढे पैशाची अडचण भासू लागल्याने त्यांनी दुसऱ्यांच्या घरची धुणीभांडी करण्याचे काम सुरू केले. 'सैराट' १०० कोटींच्या घरात गेला आणि त्यातील कलाकारांना लाखो रुपये मिळाले तरीही दिग्दर्शक नागराजची पहिली पत्नी असणाऱ्या सुनीता हलाखीचं जीणं जगत आहेत. 

Web Title: Have u seen Nagraj Manjule’s wedding photo…? Know what his wife doing after divorce