जब्बार पटेल यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2016 12:54 IST2016-06-23T07:24:49+5:302016-06-23T12:54:49+5:30
मराठी-हिंदी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक जब्बार पटेल यांचा आज वाढदिवस. वयाच्या दहाव्या वर्षापासून त्यांना नाटकात काम करण्याची आणि नाटकाचे ...
जब्बार पटेल यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
tyle="border: 0px; font-stretch: inherit; line-height: 1.6; font-family: FontAwesome; font-size: 15px; margin-bottom: 15px; outline: 0px; padding: 0px; vertical-align: baseline; color: rgb(68, 68, 68);">मराठी-हिंदी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक जब्बार पटेल यांचा आज वाढदिवस. वयाच्या दहाव्या वर्षापासून त्यांना नाटकात काम करण्याची आणि नाटकाचे दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली. सामना हा जब्बार पटेल यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट आहे.
तुझे आहे तुजपाशी, माणूस नावाचे बेट, वेड्याचे घर उन्हात या नाटकांमध्ये त्यांनी काम केले. सामना, उंबरठा, जैत रे जैत, मुसाफिर,सिंहासन यांसारखे उत्तम चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. तसेच जब्बार पटेल यांनी काही लघुपटांचे पण दिग्दर्शन केले. उदा. इंडियन थिएटर, कुसुमाग्रज, मी. एस. एम., लक्ष्मणराव जोशी, कुमार गन्धर्व.
जब्बार पटेल यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात देखील आले आहे. हुशार, अभ्यासू दिग्दर्शक जब्बार पटेल यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!