हंसराज जगतापचे यंदा तीन चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2016 11:14 IST2016-04-28T05:44:10+5:302016-04-28T11:14:10+5:30

धग या चित्रपटाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले स्थान निर्माण केले आहे. या चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले ...

Hansraj Jagtap's three films this year | हंसराज जगतापचे यंदा तीन चित्रपट

हंसराज जगतापचे यंदा तीन चित्रपट

या चित्रपटाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले स्थान निर्माण केले आहे. या चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले होते. याच चित्रपटातून बालकलाकार म्हणून हंसराज जगताप या अभिनेत्याला स्पेशल ज्युरी पुरस्कार देखील मिळाला होता. आता हा अभिनेता बालकलाकार नाही तर अभिनेता म्हणून प्रेक्षकांचे मन जिंकणार आहे. हंसराज  यंदा एक दोन नाही तर तब्बल तीन चित्रपट घेवून येत आहे. झिपºया, यारी दोस्ती व आयटम गिरी असे तीन चित्रपट  या अभिनेत्याचे प्रदर्शनास सज्ज झाले आहे. झिपºया या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार वैदय करणार आहे. तर या चित्रपटात प्रथमेश परब व हंसराज जगताप हे दोन कलाकार मुख्य भुमिकेत झळकणार आहे. तर आयटमगिरी या चित्रपटात हंसराज फ्रॅडी फेम राजेश्वरी खरात या अभिनेत्रीसोबत पाहायला मिळणार आहे. 

Web Title: Hansraj Jagtap's three films this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.