​‘हाफ तिकीट’ १५ जुलैला प्रदर्शनासाठी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2016 21:06 IST2016-05-04T15:36:15+5:302016-05-04T21:06:15+5:30

सिनेमा निर्माते नानूभाई जयसिंघानी आणि  दिग्दर्शक समित कक्कड हा लहान मुलांना केंद्रस्थानी ठेऊन त्यांचे भावविश्व रेखाटणारा ‘हाफ तिकीट’ हा ...

'Half Ticket' ready for display on July 15th | ​‘हाफ तिकीट’ १५ जुलैला प्रदर्शनासाठी सज्ज

​‘हाफ तिकीट’ १५ जुलैला प्रदर्शनासाठी सज्ज

नेमा निर्माते नानूभाई जयसिंघानी आणि  दिग्दर्शक समित कक्कड हा लहान मुलांना केंद्रस्थानी ठेऊन त्यांचे भावविश्व रेखाटणारा ‘हाफ तिकीट’ हा एक वेगळा दृष्टीकोन देणारा सिनेमा घेऊन येत आहे. ह्या सिनेमाचं आकर्षक पोश्टर नुकतच उलगडलं. येत्या १५ जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. 

या चित्रपटाच्या माध्यमातून एक आशयघन मांडला जाणार आहे. विविध विषय हाताळणारे दिग्दर्शक समित कक्कड यांनी यापूर्वी ‘आयना का बायना’ या सिनेमातून बालसुधार गृहातील लहान मुलांचं भावविश्व रेखाटलं होतं. आता हाफ तिकीटच्या माध्यमातून पुन्हा एकदा लहान मुलांची  अनोखी कहाणी ते मांडणार आहेत.   

Web Title: 'Half Ticket' ready for display on July 15th