हिरव्या रंगाच्या खणाच्या साडीत प्रार्थना बेहरेच्या दिसल्या मोहक अदा, दिसतेय फारच सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 20:13 IST2021-03-16T20:06:27+5:302021-03-16T20:13:35+5:30

प्रार्थनाने हिरव्या रंगाच्या खाणाच्या साडीतले फोटो करत सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

In a green saree prathna behre looks very beautiful | हिरव्या रंगाच्या खणाच्या साडीत प्रार्थना बेहरेच्या दिसल्या मोहक अदा, दिसतेय फारच सुंदर

हिरव्या रंगाच्या खणाच्या साडीत प्रार्थना बेहरेच्या दिसल्या मोहक अदा, दिसतेय फारच सुंदर

प्रार्थनाने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरुन केली.'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा' या मराठी सिनेमातून एंट्री मारत रसिकांची मनं जिंकली.कॉफी आणि बरंच काही, मिस्टर एंड मिसेस सदाचारी, मितवा, मस्का अशा विविध मराठी सिनेमात काम केलं आहे.

प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. ती सोशल मीडियावर फोटो व व्हिडिओ शेअर करत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती देत असते. प्रार्थना आपल्या वेगवेगळ्या फोटोशूटला घेऊन सोशल मीडियावर अलीकडे चर्चेत असते. प्रार्थनाने हिरव्या रंगाच्या खाणाच्या साडीतले फोटो करत सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. हिरव्या रंगाच्या साडीत प्रार्थना खूपच सुंदर दिसते आहे. नेहमीप्रमाणे प्रार्थनाचे हे फोटोशूट पाहून चाहते फिदा झाले आहेत. काही वेळातच हे फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल झालंय.

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर प्रार्थना लवकरच छूमंतर या मराठी सिनेमात दिसणार आहे.यात तिच्यासोबत रिंकू राजगुरू, सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमाच्या काही सीन्सचे शूटिंग लंडनमध्ये झाले आहे.

Web Title: In a green saree prathna behre looks very beautiful