सौरभ गोखलेच्या ‘शुभं भवतु’ चित्रपटाचा शानदार मुहूर्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 07:15 IST2019-01-01T07:15:00+5:302019-01-01T07:15:00+5:30

‘शुभं भवतु’ हा चित्रपट आत्ताच्या पिढीला विचार करण्यास प्रवृत्त करेल आणि तंत्रज्ञानासोबत संस्कृतीची सांगड घालताना आपल्या प्राचीन आणि उदात्त संस्कृतीचे महात्म्य अधोरेखित करेल अशी अपेक्षा आहे.

Grand muharat of saurbh gokhle movie 'shubh bhavtu' | सौरभ गोखलेच्या ‘शुभं भवतु’ चित्रपटाचा शानदार मुहूर्त

सौरभ गोखलेच्या ‘शुभं भवतु’ चित्रपटाचा शानदार मुहूर्त

ठळक मुद्दे या चित्रपटात सौरभ गोखले नायकाच्या भूमिकेत दिसणार आहेनरेंद्र भिडे हे चित्रपटाला पार्श्वसंगीत देणार आहेत

सध्याचं युग हे तंत्रज्ञानाचं युग म्हणून ओळखलं जातं. २४ तास आपण या तंत्रज्ञानाच्या गराड्यात अडकलेले असतो. आज प्रत्येक क्षेत्र तंत्रज्ञानाने काबीज केलं आहे आणि या स्पर्धेच्या युगात टिकून राहायचं असेल तर या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणं आवश्यक आहे. एकविसाव्या शतकात प्रगतीच्या दिशेने वाटचाल करताना रूढी, परंपरा, संस्कृती आणि संस्कार यांचा अभिजात वारसा आपण विसरत चाललो आहोत. या तंत्रज्ञानाशी नातं जुळताना आपल्या संस्कृतीशी असलेली नाळ आपण तोडत तर नाही ना? तंत्रज्ञानाच्या प्रवाहात वाहत जाताना आपल्याला आपल्या संस्कारांचा विसर तर पडत नाही ना? अशा महत्त्वाच्या प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणाऱ्या ‘ओम श्री चित्र प्रायव्हेट लि.’ प्रस्तुत ‘शुभं भवतु’ या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच संपन्न झाला. या चित्रपटात सौरभ गोखले नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

 ‘शुभं भवतु’ हा चित्रपट आत्ताच्या पिढीला विचार करण्यास प्रवृत्त करेल आणि तंत्रज्ञानासोबत संस्कृतीची सांगड घालताना आपल्या प्राचीन आणि उदात्त संस्कृतीचे महात्म्य अधोरेखित करेल अशी अपेक्षा आहे. सौरभ गोखलेसोबत सुखदा खांडकेकर, समीर धर्माधिकारी, कांचन गुप्ते, योगेश सोहोनी हे कलाकार चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटाचे निर्माते आणि गीतकार डॉ. शरद नयमपल्ली आणि साधना नयमपल्ली असून प्रसिद्ध दिग्दर्शक निरंजन पत्की  चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. कथा, पटकथा, संवाद आणि छायांकन सुनील खरे यांचे असेल तर ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचे संगीत चित्रपटाला लाभणार आहे. नरेंद्र भिडे हे चित्रपटाला पार्श्वसंगीत देणार आहेत. कुणाल निंबाळकर हे चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. 

Web Title: Grand muharat of saurbh gokhle movie 'shubh bhavtu'