कलाकारांना थिरकवणा-या 'या कोरियोग्राफर'च्या वाढदिवसाचे मराठी कलाकारांकडून ग्रँड सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2017 14:27 IST2017-11-28T08:57:39+5:302017-11-28T14:27:39+5:30

मराठी चित्रपटसृष्टीमधील एक आघाडीचं नाव म्हणजे उमेश जाधव. चित्रपटसृष्टीत संगीत दिग्दर्शक म्हणून उमेश जाधव यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण ...

Grand Celebration of Marathi Choreographer on the Birthday of the Artists | कलाकारांना थिरकवणा-या 'या कोरियोग्राफर'च्या वाढदिवसाचे मराठी कलाकारांकडून ग्रँड सेलिब्रेशन

कलाकारांना थिरकवणा-या 'या कोरियोग्राफर'च्या वाढदिवसाचे मराठी कलाकारांकडून ग्रँड सेलिब्रेशन

ाठी चित्रपटसृष्टीमधील एक आघाडीचं नाव म्हणजे उमेश जाधव. चित्रपटसृष्टीत संगीत दिग्दर्शक म्हणून उमेश जाधव यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मराठीतील आघाडीच्या अभिनेता आणि अभिनेत्रींना उमेश जाधव यांनी एकाहून एक सरस डान्स स्टेप्स शिकवत थिरकवलं आहे. याशिवाय उमेश जाधव यांनी काही रियालिटी शोमध्ये जजची भूमिकाही निभावली आहे. नुकतंच उमेश जाधव यांनी आपला वाढदिवस साजरा केला.सोशल मीडियावर एक्टिव्ह असणा-या उमेश जाधव यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या फ़ॅन्सनी शुभेच्छा देत वाढदिवसाचे सेलिब्रेशन केलं. उमेश जाधव यांच्या चित्रपटसृष्टीतील मित्र मैत्रिणींनीही त्यांच्या वाढदिवसाचे जोरदार सेलिब्रेशन केले. यावेळी अनेक मराठी कलाकारांनी वाढदिवसांच्या दिवशी उमेश यांच्या घरी हजेरी लावत सरप्राइज दिलं. या कलाकारांमध्ये तेजस्विनी पंटीत, अंकुश चौधरी, उमेश कामत, सिद्धार्थ जाधव आणि त्याची पत्नी तृप्ती जाधव, सुशांत शेलार यांसारख्या कलाकारांचा सहभाग होता. यावेळी सगळ्यांनी धम्माल सेलिब्रेशन करत पार्टी एन्जॉय केली. यावेळी काही कलाकारांनी उमेश जाधव यांच्यासाठी केक आणले होते. उमेश यांनी या पार्टीचे सर्व फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंना रसिकांचीही पसंती लाभते आहे.

नुकताच रसिकांच्या या लाडक्या अभिनेत्रीचा म्हणजेच अमृता खानविलकर हिचा वाढदिवस झाला.मोठ्या उत्साहात रसिकांनीही अमृताचा वाढदिवस साजरा केला. सोशल मीडियाच्या माध्यमातून रसिकांनी अमृताला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अमृताच्या घरीही तिचा ३२वा वाढदिवस दणक्यात सेलिब्रेट करण्यात आला. यावेळी तिचा पती आणि टी.व्ही अभिनेता हिमांशू मल्होत्रा आणि अमृताच्या आईने तिच्यासाठी खास सरप्राईज पार्टी ठेवली होती. बर्थ डे सेलिब्रेशन दरम्यान मराठी अभिनेत्री सोनाली खरेसुद्धा आपल्या खास मैत्रिणीला शुभेच्छा देण्यासाठी यावेळी आवर्जून उपस्थित होती.वाढदिवसानिमित्त अमृताला पती हिमांशूकडून खास गिफ्टसुद्धा मिळालं आहे. हेच गिफ्ट हातात घेतलेला फोटोही यांत पाहायला मिळतो आहे. या फोटोंमध्ये अमृता आनंदी आणि उत्साही असल्याचे दिसून येत आहे. अमृताच्या या वाढदिवस सेलिब्रेशनच्या फोटोंवर रसिकांकडूनही लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Web Title: Grand Celebration of Marathi Choreographer on the Birthday of the Artists