Exclusive राजकमल स्टुडिओत गोविंद निहलानींच्या सिनेमाचे होणार शुटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2016 13:32 IST2016-07-08T08:02:36+5:302016-07-08T13:32:36+5:30

     प्रियांका लोंढे            बॉलीवुडच नाही तर भारतातील टॉप टेन डिरेक्टर्समध्ये नाव घेता येईल असे ...

Govind Nihalani's film will be shot in Exclusive Rajkamal Studio | Exclusive राजकमल स्टुडिओत गोविंद निहलानींच्या सिनेमाचे होणार शुटिंग

Exclusive राजकमल स्टुडिओत गोविंद निहलानींच्या सिनेमाचे होणार शुटिंग

 
r />   प्रियांका लोंढे

           बॉलीवुडच नाही तर भारतातील टॉप टेन डिरेक्टर्समध्ये नाव घेता येईल असे दिग्दर्शक म्हणजे गोविंद निहलानी. तब्बल दहा वषार्नंतर गोविंदजी पुन्हा एकदा फिल्म डिरेक्शनकडे वळले असुन आता ते बॉलीवुडचा सिनेमा नाही तर चक्क एक मराठी चित्रपट दिग्दर्शीत करणार आहेत.  कट्यार काळजात घुसली, बालगंधर्व, लोकमान्य एक युगपुरुष यासारख्या चित्रपटांमध्ये दजेर्दार अभिनय साकारणाºया सुबोध भावेंवर गोविंदजींची नजर पडली अन आपल्या चित्रपटामध्ये त्यांनी सुबोधला लीड रोल दिला. मराठी सिनेमाच नाही तर बॉलीवुडमध्ये देखील आपल्या अभिनयाची चुणुक दाखवून सर्वांचीच वाहवा मिळवलेली आपली मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यामध्ये सुबोधच्या अपोझिट आपल्याला पहायला मिळणार आहे. या चित्रपटाबद्दल सीएनएक्सला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह इंटर्व्ह्यु मध्ये बोलताना सुबोधने सांगितले की, गोविंद निहलानी हे नाव भारतातील मोठ्या दिग्दर्शकांपैकी एक आहे, अन त्यांच्या चित्रपटात भुमिका साकारण्याची संधी मला मिळणे हा मी माझा सन्मानच समजतो.  गोविंदजींच्या चित्रपटांच्या स्टाईलची ही एक कथा आहे. शांताराम बापुंच्या राजकमल स्टुडिओत या चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात होणार आहे ही माज्यासाठी खुपच आनंदाची गोष्ट आहे.

                                     

             तर सोनालीने देखील तिच्या या चित्रपटाविषयीच्या भावना सीएनएक्ससोबत शेअर करताना सांगितले की, मला फारच आनंद होत आहे मी या चित्रपटाचा भाग होऊ शकले. गोविंदजी कॅमेरामन असताना त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली होती. आता पुन्हा एकदा त्यांच्यासोबत काम करायला मिळणार म्हणुन मी खुप हॅपी आहे. माज्या करिअरच्या दृष्टीने हा चित्रपट माज्यासाठी टर्निंग पॉईंट असणार आहे. या चित्रपटाचे नाव जरी आजुन गुलदस्त्यात असले तरी मराठी चित्रपट सृष्टीला एक दजेर्दार चित्रपट लवकरच मिळेल अशी सध्या तरी आपण आशा करुयात. प्रियांका लोंढे

..............................................................................................

Web Title: Govind Nihalani's film will be shot in Exclusive Rajkamal Studio

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.