​स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वेच्या फॅन्ससाठी खुशखबर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2017 10:32 AM2017-12-04T10:32:06+5:302017-12-04T16:02:06+5:30

स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वे यांच्या जोडीचा मुंबई-पुणे-मुंबई हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटातील त्या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना ...

Good news for the fans of Swapnil Joshi and Mukta Barve | ​स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वेच्या फॅन्ससाठी खुशखबर

​स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वेच्या फॅन्ससाठी खुशखबर

googlenewsNext
वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वे यांच्या जोडीचा मुंबई-पुणे-मुंबई हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटातील त्या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. या चित्रपटानंतर स्वप्निल आणि मुक्ता यांची जोडी आपल्याला अनेक चित्रपट, मालिकांमध्ये पाहायला मिळाली होती. मुंबई-पुणे-मुंबई या चित्रपटाच्या यशामुळे मुंबई-पुणे-मुंबई २ हा या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटातही प्रेक्षकांना स्वप्निल आणि मुक्ताची जोडी पाहायला मिळाली होती. हा चित्रपटदेखील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला होता आणि आता मुंबई-पुणे-मुंबई ३ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला देखील सुरुवात झाली आहे. स्वप्निल जोशीनेच सोशल मीडियाद्वारे त्याच्या फॅन्सना ही गुड न्यूज दिली आहे. स्वप्निलने या चित्रपटाचा क्लॅप बोर्ड शेअर केला आहे. त्यावर मुंबई-पुणे-मुंबई ३, मुहूर्त शॉर्ट, शॉर्ट नं २१ आणि टेक नंबर एक असे लिहिले आहे. स्वप्निलची ही पोस्ट वाचून त्याच्या फॅन्सना प्रचंड आनंद झाला आहे. अनेकांनी ही पोस्ट लाइक केली असून अनेकांनी या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच अनेकांनी ही पोस्ट शेअर देखील केली आहे. 
एखादा चित्रपट हिट झाला की, त्याचा सिक्वल बनवण्याचे फॅड आजवर आपल्याला हॉलिवूड, बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये पाहायला मिळाले होते. आता मराठीतदेखील तोच ट्रेंड यायला लागला आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. आपल्याला हा ट्रेंड मुंबई-पुणे-मुंबईच्या निमित्ताने आता पाहायला मिळत आहे. 
मुंबई-पुणे-मुंबई २ या चित्रपटानंतर अनेकांनी या चित्रपटाचा पुढचा भाग पाहाण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळेच तिसऱ्या भागाची जुळवाजुळव करण्याची या चित्रपटाच्या टीमने सुरुवात केली. या चित्रपटाच्या तिसऱ्या भागातदेखील स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वे यांचीच जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तसेच चित्रपटातील टीमदेखील तीच राहाणार असल्याचे म्हटले जात आहे. 
मुंबई-पुणे-मुंबई या चित्रपटाच्या दोन्ही भागातील गाणीदेखील प्रचंड गाजली होती. त्यामुळे आता या चित्रपटाचा तिसरा भागही संगीतमय असणार असे म्हणायला काहीच हरकत नाही. 

Also Read : ​अभिनेता स्वप्निल जोशीची निर्मिती असलेली पहिली मालिका 'नकळत सारे घडले'

Web Title: Good news for the fans of Swapnil Joshi and Mukta Barve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.