नेहमी ग्लॅमरस दिसणारी सोनाली दिसली ट्रेडिशनल लूकमध्ये, फॅन्सनी केल्या अशा कमेंट्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 15:33 IST2019-05-16T15:32:27+5:302019-05-16T15:33:04+5:30

सोनाली कुलकर्णीने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. मराठीप्रमाणेच बॉलिवूडमध्येदेखील तिने आपले प्रस्थ निर्माण केले आहे.

Glamorous girl sonali kulkarni appears in traditional look | नेहमी ग्लॅमरस दिसणारी सोनाली दिसली ट्रेडिशनल लूकमध्ये, फॅन्सनी केल्या अशा कमेंट्स

नेहमी ग्लॅमरस दिसणारी सोनाली दिसली ट्रेडिशनल लूकमध्ये, फॅन्सनी केल्या अशा कमेंट्स

ठळक मुद्देतिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत

सोनाली कुलकर्णीने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. मराठीप्रमाणेच बॉलिवूडमध्येदेखील तिने आपले प्रस्थ निर्माण केले आहे. सोशल मीडियावर सोनाली कुलकर्णी नेहमीच अॅक्टिव्ह असते. ती आपल्या फॅन्ससोबत नेहमीच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत.

सोनालीने तिचा लाल साडीतला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोतील तिचा सिंपल लूक चाहत्यांच्या चांगला पसंतीस उतरला आहे. सोनालीच्या या फोटोवर फॅन्सकडून लाईक्स आणि कमेंट्स भरपूर मिळाल्या आहेत. लाल रंगाच्या साडीत सोनालीचे सौंदर्य आणखीनच खुलून आल्याचे दिसून येत आहे. सोनाली  आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत नेहमीच जास्त सजग असते. 


सोनाली कुलकर्णी हे नाव आज मराठी चित्रपटसृष्टीत अतिशय महत्त्वाचे मानले जाते. दिल चाहता है हा चित्रपट सोनालीच्या करियरचा टर्निंग पॉईंट ठरला. या चित्रपटाने तिला खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली.

लवकरच सोनाली सलमान खानच्या भारत या आगामी सिनेमात दिसणार आहे. सोनालीने स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली, मात्र यात ती नेमकी कोणती भूमिका साकारणार आहे हे अद्याप गुलदस्त्यात आहे. ईदच्या मुहूर्तावर 'भारत' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा हिंदीशिवाय, तमिळ, तेलगू आणि मल्याळम भाषेत रिलीज होणार आहे 
 

Web Title: Glamorous girl sonali kulkarni appears in traditional look