सासूबाईंच्या वाढदिवशी जिनिलीयाची पोस्ट, शेअर केला सुंदर फोटो, म्हणते- "तुम्ही नेहमीच..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 16:56 IST2024-10-10T16:55:13+5:302024-10-10T16:56:26+5:30

रितेशची आई आणि महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पत्नी वैशाली देशमुख यांचा वाढदिवस आहे. सासूबाईंच्या वाढदिवशी जिनिलीयाने खास पोस्ट शेअर केली आहे. 

genelia deshmukh shared post on mother in law ritesh deshmukh mom birthday | सासूबाईंच्या वाढदिवशी जिनिलीयाची पोस्ट, शेअर केला सुंदर फोटो, म्हणते- "तुम्ही नेहमीच..."

सासूबाईंच्या वाढदिवशी जिनिलीयाची पोस्ट, शेअर केला सुंदर फोटो, म्हणते- "तुम्ही नेहमीच..."

रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख हे महाराष्ट्राचे लाडके कपल आहेत. त्यांच्याकडे आदर्श कपल म्हणून पाहिलं जातं. देशमुखांची सून झाल्यापासून जिनिलीयादेखील मराठमोळी झाली आहे. आज रितेशची आई आणि महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पत्नी वैशाली देशमुख यांचा वाढदिवस आहे. सासूबाईंच्या वाढदिवशी जिनिलीयाने खास पोस्ट शेअर केली आहे. 

जिनिलीयाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन सासूबाईंबरोबरचा अतिशय गोड आणि सुंदर फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत जिनिलीयाने त्यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. "हॅपी बर्थडे आई...खूप सारं प्रेम. नेहमीच प्रतिष्ठेने नेतृत्व केल्याबद्दल आणि अनुकरण करण्यासारखं एक उदाहरण समोर ठेवल्याबद्दल खूप धन्यवाद", असं जिनिलीयाने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 


रितेश आणि जिनिलीयाने २०१२ साली लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली. लग्नानंतर सासूबाईंकडूनच मराठी शिकल्याचं जिनिलीयाने मुलाखतीत सांगितलं होतं. त्याबरोबरच सासूबाईंकडूनच जिनिलीया महाराष्ट्रीयन पदार्थही बनवायला शिकली. जिनिलीया आणि वैशाली देशमुख यांचं सासूसुनेचं नातं अगदी मैत्रिणीसारखंच आहे. जिनिलीयानेच अनेकदा याबाबत सांगितलं आहे.

Web Title: genelia deshmukh shared post on mother in law ritesh deshmukh mom birthday