अभिनय सोडून पाहा काय करतोय गौरव घाटणेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 18:06 IST2018-07-30T17:59:11+5:302018-07-30T18:06:16+5:30
गौरव घाटणेकर सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असतो. तो नेहमीच त्याच्या फॅन्ससोबत सोशल मीडियाद्वारे संपर्कात असतो. तो कुठे जात आहे, कुठे फिरत आहे हे सगळे काही तो त्याच्या सोशल मीडियावर शेअर करत असतो. तो नुकताच थायलंडला गेला असून तेथील अनेक फोटो, व्हिडिओ तो त्याच्या इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट करत आहे.

अभिनय सोडून पाहा काय करतोय गौरव घाटणेकर
तुज विन सख्या रे या मालिकेमुळे नावारूपाला आलेल्या अभिनेता गौरव घाटणेकरने छोट्या पडद्यावर काम करण्यासोबतच अनेक चित्रपटांमध्येदेखील काम केले आहे. तुझी माझी लव्हस्टोरी या चित्रपटातील त्याचे काम प्रेक्षकांना खूप आवडले होते. गौरव एक खूपच चांगला अभिनेता आहे. प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती मराठे ही त्याची पत्नी आहे. गौरव नुकताच फिरायला थायलंडला गेला असून तेथील काही फोटो त्याने त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
गौरव घाटणेकर सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असतो. तो नेहमीच त्याच्या फॅन्ससोबत सोशल मीडियाद्वारे संपर्कात असतो. तो कुठे जात आहे, कुठे फिरत आहे हे सगळे काही तो त्याच्या सोशल मीडियावर शेअर करत असतो. तो नुकताच थायलंडला गेला असून तेथील अनेक फोटो, व्हिडिओ तो त्याच्या इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट करत आहे. त्याने शेअर केलेल्या फोटोंमधील एक फोटो त्याच्या फॅन्सने चांगलेच लक्ष वेधून घेत आहे. कारण या फोटोत गौरवच्या हातात चक्क मोठा कालथा असून तो मोठाल्या कढईत असलेले मिश्रण हलवत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. हा फोटो पाहून गौरव आता अभिनय सोडून शेफ तर बनत नाही ना.... असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. पण या फोटोमागे काय गुपित आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. थायलंडला गेल्यावर गौरवने एका खास ठिकाणाला भेट दिली आहे. हे खास ठिकाण गुळ बनवण्याचे ठिकाण असून तिथे गौरवने गुळ बनवण्याचा प्रत्यन देखील केला आहे. या फोटोसोबत मी थायलंड मध्ये असून मी गुळ बनवत आहे असे त्याने कॅप्शन मध्ये लिहिले आहे. त्याचा हा फोटो त्याच्या फॅन्सना खूप आवडला असून त्यांनी या फोटोला खूप सारे लाइक्स दिले आहेत. तसेच या फोटोवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. या फोटोत तो खूप कुल दिसत आहे. त्याने या फोटोत घातलेली कॅप खूपच क्यूट आहे.