जोडी जुळवून देणाऱ्या 'गॅटमॅट' चे पोस्टर लाँच, या कलाकारांच्या मुख्य भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 22:34 IST2018-10-08T22:33:57+5:302018-10-08T22:34:32+5:30

'गॅटमॅट' हा सिनेमा येत्या १६ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. राजेंद्रप्रसाद श्रीवास्तव यांची निर्मिती आणि निशीथ श्रीवास्तव ह्यांचे दिग्दर्शन असलेल्या या सिनेमाच्या पोस्टरवर अक्षय टंकसाळे, निखिल वैरागर, रसिका सुनील आणि पूर्णिमा डे हे मराठितील युवा कलाकार सिनेमात झळकणार आहेत.

Gatmat Marathi Movie poster launch | जोडी जुळवून देणाऱ्या 'गॅटमॅट' चे पोस्टर लाँच, या कलाकारांच्या मुख्य भूमिका

जोडी जुळवून देणाऱ्या 'गॅटमॅट' चे पोस्टर लाँच, या कलाकारांच्या मुख्य भूमिका

प्रेमी जोडप्यांची पहिली भेट घडवून आणणाऱ्या आगामी 'गॅटमॅट' सिनेमाचं नुकतंच सोशल नेट्वर्किंग साईटवर पोस्टर लाँच करण्यात आलं. 'आम्ही जुळवून देतो' अशी टॅगलाईन असलेल्या या सिनेमाच्या पोस्टरवर चित्रपटातील प्रमुख कलाकारांची झलक आपणांस पहायला मिळते. अवधूत गुप्ते ह्यांची प्रस्तुती असलेला यशराज इंडस्ट्रीज प्रोडक्शन्स निर्मित मराठी चित्रपट 'गॅटमॅट' हा सिनेमा येत्या १६ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. राजेंद्रप्रसाद श्रीवास्तव यांची निर्मिती आणि निशीथ श्रीवास्तव ह्यांचे दिग्दर्शन असलेल्या या सिनेमाच्या पोस्टरवर अक्षय टंकसाळे, निखिल वैरागर, रसिका सुनील आणि पूर्णिमा डे हे मराठितील युवा कलाकार आपल्याला पहायला मिळतात. 

तरुणाईने बहरलेलं 'गॅटमॅट' सिनेमाचं हे पोस्टर पाहणाऱ्यांचा मूड फ्रेश करून टाकतो. शिवाय, प्रेमाची गुलाबी छटादेखील या पोस्टरमधून दिसत असल्याकारणामुळे प्रेमवीरांसाठी हा सिनेमा पर्वणीच ठरणार आहे. प्रेम जुळवून आणणाऱ्या या आगळ्यावेगळ्या सिनेमाशी 'गॅटमॅट' करून घेण्यास प्रेक्षकदेखील उत्सुक असतील हे निश्चित.


विशेष म्हणजे या सिनेमात सा-यांची लाडकी अभिनेत्री माझ्या नव-याची फेम शनाया अर्थात रसिका सुनिल झळकणार आहे. तिची भूमिक सिनेमात कशी असणार याविषयी अधिक माहिती  समोर आली नसली तरीही तिला रूपेरी पडद्यावर पाहण्याची संधी मात्र तिच्या चाहत्यांना या सिनेमाच्या माध्यमातून मिळणार आहे.

शनायाने  मालिकेत निगेटिव्ह भूमिका साकारली असली तरी तिच्या भूमिकेत एक वेगळेपण होते. निगेटिव्ह भूमिका असली तरी त्यातही आपल्या हटके अंदाजात रसिका सुनील हिने शनाया साकारली होती. तिचा मालिकेतील अल्लडपणा रसिकांना भावला होता. त्यामुळे प्रत्येक वयोगटातील रसिकांना शनाया पसंतीस पात्र ठरली. 

रसिकाने  'माझ्या नव-याची बायको' मालिकेला अलविदा केल्यानंतर पहिल्यांदाच तिच्या मनात दडलेल्या भावनांना वाट मोकळी करून देणारी एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने म्हटले आहे की, मालिकेला मिळणा-या ''टीआरपीचे आकडे बदलत राहतील मात्र रसिकांचे मिळणारे प्रेम असेच राहु द्या''. शनाया फिल्म मेकिंग आणि दिग्दर्शनाचं शिक्षण घेण्यासाठी न्युयॉर्कला गेली असली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून तरी तिने  चाहत्यांसह संवाद साधत रहावा असेही चाहते तिला सुचवत आहेत.

Web Title: Gatmat Marathi Movie poster launch