'हँडसम हंक' गश्मीर महाजनीची क्रश कोण? 'या' मराठी अभिनेत्रीचे नाव घेत म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 15:12 IST2025-08-13T15:10:48+5:302025-08-13T15:12:20+5:30
गश्मिरनं लोकप्रिय मराठी अभिनेत्री त्याची क्रश असल्याचं अभिनेत्यानं सांगितलं आहे.

'हँडसम हंक' गश्मीर महाजनीची क्रश कोण? 'या' मराठी अभिनेत्रीचे नाव घेत म्हणाला...
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता गश्मीर महाजनी आपल्या देखण्या लूक आणि दमदार अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असतो. मालिकांपासून ते चित्रपटांपर्यंत आणि रिअॅलिटी शोपर्यंत गश्मीरने नेहमीच आपल्या कामगिरीने चाहत्यांना प्रभावित केलं आहे.ऑनस्क्रीन त्याच्या रोमँटिक अदा चाहत्यांना भावतातच, पण ऑफस्क्रीनही तो आपल्या व्यक्तिमत्त्वाने सगळ्यांना भुरळ घालतो.गश्मीर महाजनी अनेक तरुणींच्या हृदयावर राज्य करतो. तो अनेकींचा क्रश आहे. मात्र, स्वतः गश्मीरची क्रश कोण आहे, याबद्दल खुलासा केलाय. एक लोकप्रिय मराठी अभिनेत्री त्याची क्रश असल्याचं अभिनेत्यानं सांगितलं आहे.
गश्मीर हा अनेकदा त्याच्या सोशल मीडियावर Askme सेशन घेत असतो. नुकतंच त्याने इन्स्टाग्राम Askme सेशन घेतलं होतं. या सेशनमध्ये चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्याने उत्तरं दिली. या सेशनमध्ये गश्मीरला चाहत्याने "मराठी चित्रपटसृष्टीत तुझी क्रश कोण आहे?" असं विचारलं. चाहत्याच्या या प्रश्नाचं उत्तर देताना गश्मीरनं लोकप्रिय अभिनेत्री आश्विनी भावे यांचं नाव घेतलं. तो म्हणाला, "मला वाटतं की, आश्विनी भावे मॅडम त्यांच्या काळात आणि आतासुद्धा माझ्या क्रश आहेत".
यासोबतच त्याला "तुझी आवडती सहअभिनेत्री कोण आहे?" असा प्रश्न एका चाहत्यानं केला. यावर गश्मीर हसण्याच्या इमोजीही शेअर करत म्हटलं "माझी पत्नी. ती खूप अभिनय करते". गश्मीरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्याने आतापर्यंत 'सरसेनापती हंबीरराव', 'देऊळ बंद', 'विशू', 'डोंगरी का राजा' अशा सिनेमांमध्ये काम केलं आहे. शिवाय तो हिंदी मालिकांमध्ये झळकला आहे. अभिनय क्षेत्र गाजवल्यानंतर आता गश्मीर दिग्दर्शनात पहिलं पाऊल टाकलंय. यासोबतच तो लेखक आणि निर्मात्याची बाजूही सांभाळताना दिसणार आहे.