"मराठी इंडस्ट्री साऊथसारखी प्रगती करू शकते का?", चाहत्याच्या प्रश्नावर गश्मीर म्हणतो- आपणच आपले पाय ओढतो आणि...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 09:01 AM2024-03-15T09:01:16+5:302024-03-15T09:02:05+5:30

गश्मीरने नुकतंच त्याच्या इन्स्टाग्रामवरुन askgashmeer सेशन घेतलं होतं. यामध्ये चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्याने उत्तरं दिली.

gashmeer mahajani reply to fan who ask him about marathi and south industry | "मराठी इंडस्ट्री साऊथसारखी प्रगती करू शकते का?", चाहत्याच्या प्रश्नावर गश्मीर म्हणतो- आपणच आपले पाय ओढतो आणि...

"मराठी इंडस्ट्री साऊथसारखी प्रगती करू शकते का?", चाहत्याच्या प्रश्नावर गश्मीर म्हणतो- आपणच आपले पाय ओढतो आणि...

गश्मीर महाजनी हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. मराठीबरोबरच हिंदीमध्येही गश्मीरने त्याच्या अभिनयाचा ठसा उमटवला. मराठी सिनेसृष्टीतील हँडसम हंक म्हणून ओळखला जाणारा गश्मीर त्याच्या फिटनेसकडेही विशेष लक्ष देताना दिसतो. गश्मीर सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबरोबरच तो वैयक्तिक आयुष्यातील अपडेटही चाहत्यांना देत असतो. अनेकदा गश्मीर इन्स्टाग्रामवरुन askgashmeer हे सेशन घेत चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं देतो. 

गश्मीरने नुकतंच त्याच्या इन्स्टाग्रामवरुन askgashmeer सेशन घेतलं होतं. यामध्ये चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्याने उत्तरं दिली. एका चाहत्याने गश्मीरला "मराठी इंडस्ट्री साऊथसारखी प्रगती करू शकते का?" असा प्रश्न विचारला. चाहत्याच्या या प्रश्नाला गश्मीरने अगदीच चोख उत्तर दिलं आहे. "नक्कीच...आपल्याकडे आपणच आपलं कौतुक करतो आणि आपणच आपले पाय ओढतो...हा पॅटर्न तोडला पाहिजे", असं गश्मीर म्हणाला.  

दरम्यान, गश्मीरने अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे.'देऊळ बंद', 'सरसेनापती हंबीरराव', 'धर्मवीर', 'कॅरी ऑन मराठा', 'बोनस' या सिनेमांमध्ये तो मुख्य भूमिकेत दिसला. 'ईमली', 'तेरे इश्क मे घायल' या हिंदी मालिकांमध्येही गश्मीर झळकला. त्याने वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. याबरोबरच 'डोंगरी का राजा', 'पानीपत' या बॉलिवूड सिनेमांमध्येही त्याने काम केलं आहे. 

Web Title: gashmeer mahajani reply to fan who ask him about marathi and south industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.