'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 14:37 IST2025-09-28T14:36:42+5:302025-09-28T14:37:28+5:30
नुकतंच गश्मीरने सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. चाहत्याच्या या प्रश्नावर गश्मीरचं उत्तर काय?

'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
गश्मीर महाजनी मराठीतील मोस्ट हँडसम अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याच्या लूक्सवर तरुणी फिदा आहेत. प्राजक्ता माळीसोबत तो 'फुलवंती' सिनेमात दिसला. यातही त्याच्या अभिनयाचं आणि चार्मिंग लूकचं कौतुक झालं. गश्मीर विवाहित असून त्याला एक मुलगाही आहे. गौरी देशमुखसोबत त्याने २०१४ मध्येच लग्न केलं. नुकतंच गश्मीरने सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. खऱ्या आयुष्यात कोणी दुसरीच मुलगी आवडली तर? असा प्रश्न एका चाहत्याने विचारला असता गश्मीर काय म्हणाला वाचा.
गश्मीर महाजनी अनेकदा इन्स्टाग्रामवर 'आस्क गश' हे प्रश्नोत्तराचं सेशन घेतो. यामध्ये चाहते त्याला प्रश्न विचारतात. एका चाहत्याने विचारलं,'फुलवंती'सिनेमात दाखवलं तसंच खऱ्या आयुष्यातही नकळत तू कोणा दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर?' यावर गश्मीरने उत्तर देत लिहिले, 'प्रेमात पडणं हे कधीच नकळत होत नसतं'.
'फुलवंती' सिनेमात गश्मीरने शास्त्रीबुवांची भूमिका साकारली आहे. यामध्ये शास्त्रीबुवा विवाहित असतात. तरी नकळत ते फुलवंतीच्या प्रेमात पडतात. मात्र हे प्रेम ते तिच्यासमोर कधीच व्यक्त करत नाहीत आणि आपल्या पत्नीसोबत दूर निघून जातात. अव्यक्त प्रेम तसंच राहतं आणि फुलवंतीलाही त्यांच्या मनातलं कळतं अशी ती गोड प्रेमकहाणी आहे. गश्मीर महाजनीने खऱ्या आयुष्यात मात्र असं नकळत कधी होत नसतं असं चाहत्याला उत्तर दिलं आहे.