परेकरांची पंचवीशी पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2016 09:02 IST2016-02-25T16:02:21+5:302016-02-25T09:02:21+5:30

फिल्ममेकर सचिन परेकर यांनी चित्रपटसृष्टीत पंचवीस वर्षे पूर्ण केली. याचे औचित्य साधून त्यांनी जोरदार सेलिब्रेशन केले. यावेळी वर्षा उसगावकरला ...

Fulfillment of Five Years | परेकरांची पंचवीशी पूर्ण

परेकरांची पंचवीशी पूर्ण

ल्ममेकर सचिन परेकर यांनी चित्रपटसृष्टीत पंचवीस वर्षे पूर्ण केली. याचे औचित्य साधून त्यांनी जोरदार सेलिब्रेशन केले. यावेळी वर्षा उसगावकरला विशेष आमंत्रण देण्यात आले. परेकरांचा पहिला चित्रपट ‘शेजारी शेजारी’मध्ये वर्षा उसगावकर अभिनेत्री होती.

याप्रसंगी परेकरांनी त्यांच्या आगामी चित्रपटाचीसुद्धा घोषणा केली. ‘टाफटा’ असे त्याचे नाव आहे. टाफटा पर्शियन भाषेतील शब्द असून त्याचा अर्थ एका प्रकारचे सूत असा होतो. असे आगळेवेगळे नाव निवडण्याचे कारण चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल.

ही एक लव्हस्टारी असून भावना आणि नातेसंबंधांचा गुंता कसा उलगडला जातो याची कथा आहे. परंतु निर्मात्यांनी हा एकदम वेगळ्या प्रकारचा सिनेमा असणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

sidharth

तुषार गोडसे यांनी पटकथा लिहिली असून नितीन सवळे चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. सिद्धार्थ चांदेकर, अभिजित खांडकेकर, प्राजक्ता माळी आणि पल्लवी पाटिल अशी यंग कलाकरांचा यामध्ये भरणा असणार आहे.

Photo Source : MMW

Web Title: Fulfillment of Five Years