फ्लोरा झळकणार मराठी चित्रपटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2017 13:13 IST2017-05-25T07:43:52+5:302017-05-25T13:13:52+5:30

तामिळ अभिनेत्री फ्लोरा सैनी लवकरच "परी हुँ मैं" या मराठी चित्रपटात झळकणार आहे. फ्लोराने तामिळ बरोबरच अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये ...

Flora glances in the Marathi film | फ्लोरा झळकणार मराठी चित्रपटात

फ्लोरा झळकणार मराठी चित्रपटात

मिळ अभिनेत्री फ्लोरा सैनी लवकरच "परी हुँ मैं" या मराठी चित्रपटात झळकणार आहे. फ्लोराने तामिळ बरोबरच अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. फ्लोराचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. यात ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या आधी फ्लोरा विद्या बालन बरोबर "बेगम जान" या चित्रपटात दिसली होती.
रोहित शिलवंत दिग्दर्शित 'परी हुँ मैं' या चित्रपटात एका मध्यमवर्गीय कुटुंबाचा ध्येयापर्यंतचा पॅशनेबल प्रवास मांडण्यात आला आहे .टीव्ही अभिनेत्री ते यशस्वी चित्रपट अभिनेत्री असा एका अभिनेत्री प्रवास दाखवण्यात आला आहे आणि ही भूमिका फ्लोरा साकारतेय. फ्लोराला तिच्या भूमिकेबाबत विचारले असता ती म्हणते, या चित्रपटाचे विषय खूप वेगळा आहे.  आजकालच्या आयुष्यात येणारे चढ उतार आणि त्यातून घडणाऱ्या गोष्टी त्या सुंदरपणे लिहिल्या आहेत. हा विषय इतका वेगळा आहे की हा चित्रपट हिंदी मध्ये सुद्धा तयार करण्यात येवा अशी माझी इच्छा आहे. यातली गोष्ट आपल्या आर्थिक परिस्थितीशी झगडणाऱ्या एक मध्यम वर्गीय कुटुंबाची आहे. या कुटुंबाचा मी पण एक भाग आहे. 
रोहितने मला नागेश कुकुनूरच्या धनक या चित्रपटात पाहिले आणि मला लक्षात ठेवले. जेव्हा या चित्रपटची तयारी सुरू झाली तेव्हा त्याने मला या भूमिकेबद्दल विचारले. त्याने मला लक्षात ठेवले त्या बद्दल मी त्याची आभारी आहे. तसेच मी माझ्या भूमिकेला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. या चित्रपटात फ्लोरास नंदू माधव, देविका दफ्तरदार, श्रुती निगडे हे दमदार कलाकार या चित्रपटात आहेत. या चित्रपटाचा मुहुर्त नुकताच पार पडला. 


Web Title: Flora glances in the Marathi film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.