नादखुळा मंजुळा’ धमाकेदार अल्बम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2016 14:37 IST2016-09-06T09:07:35+5:302016-09-06T14:37:35+5:30

मराठी संगीत रसिकांच्या अभिरुचीची दखल घेत दर्जेदार आणि उत्तमोत्तम कलाकृतींची निर्मिती करण्याच्या उद्देशाने रोहिणी प्रफुल्ल यांनी ‘म्युझिक मिडीया सिनेव्हिजन’ ...

Flickr masculine 'steam album | नादखुळा मंजुळा’ धमाकेदार अल्बम

नादखुळा मंजुळा’ धमाकेदार अल्बम


/>मराठी संगीत रसिकांच्या अभिरुचीची दखल घेत दर्जेदार आणि उत्तमोत्तम कलाकृतींची निर्मिती करण्याच्या उद्देशाने रोहिणी प्रफुल्ल यांनी ‘म्युझिक मिडीया सिनेव्हिजन’ या कंपनीची मुहूर्तमेढ रोवली आहे. या कंपनीतर्फे ‘नादखुळा मंजुळा’ हा धमाकेदार म्युझिकल अल्बम नुकताच तयार करण्यात आला आहे.
 
       ‘नादखुळा मंजुळा’ हे गीत के. प्रफुल्ल यांनी लिहिले असून या गीताला श्रवणीय संगीताची आणि आवाजाची साथ गायक शाम सागर यांनी दिली आहे. सारा श्रवण व अभिक बॅनर्जी या कलाकारांवर चित्रीत या गीताची कोरिओग्राफी विकी खान यांनी केली आहे. ‘नादखुळा मंजुळा’ हे गीत हरेश सावंत यांच्या कॅमेरातून चित्रीत झालं असून याचे व्हिडीओ डायरेक्टर अमोल भावे आहेत. उडत्या चालीचे ठेका धरायला लावणारं हे गीत तरुणाईला नक्कीच आवडेल .  

 

Web Title: Flickr masculine 'steam album