पहिल्यांदाच सुशांत शेलार झळकणार मुख्य भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2016 10:29 IST2016-09-24T07:45:31+5:302016-09-27T10:29:55+5:30

दुनियादारी या चित्रपटातील प्रितम म्हणजेच सुशांत शेलार हा लवकरच एका हटक्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आता तो थेट ...

For the first time Sushant Shelar will be seen in the main role | पहिल्यांदाच सुशांत शेलार झळकणार मुख्य भूमिकेत

पहिल्यांदाच सुशांत शेलार झळकणार मुख्य भूमिकेत

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">दुनियादारी या चित्रपटातील प्रितम म्हणजेच सुशांत शेलार हा लवकरच एका हटक्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आता तो थेट एका चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. संतोष शेट्टी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून या चित्रपटाविषयी सुशांत शेलार लोकमत सीएनएक्सला सांगतो, मी आतापर्यत सर्व चित्रपटात मस्तीखोर, कॉलेज गोइंग मुलांच्या भूमिका केल्या आहेत. पण आता या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच एका जबाबदार व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहे. कॉलेजच्या मुलांचा अ‍ॅटीटयूड दाखविणे सोपे असते. पण घरातील एका जबाबदार व्यक्तीची भूमिका करताना खूप आव्हानात्मक असते. त्याचबरोबर या भूमिकेची काळजीदेखील खूप घ्यावी लागते. या चित्रपटात अभिनेता अरूण नलावडे माझ्या वडिलांची भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असून हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे अजून गुलदस्त्यात आहे.

Web Title: For the first time Sushant Shelar will be seen in the main role