लॉस्ट आणि फाऊंड चित्रपटाचे पहिले गाणे प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2016 14:05 IST2016-07-10T08:35:43+5:302016-07-10T14:05:43+5:30

अभिनेता सिध्दार्थ चांदेकर व अभिनेत्री स्पृहा जोशी या जोडीचा आगामी मराठी चित्रपट लॉस्ट अँड फाऊंड या चित्रपटाचे पहिले गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. या चित्रपटाच्या सुंदर टिझर, ट्रेलरने आधीच प्रेक्षकांचं मन जिंकलेआहे. आता सोशल मिडीयावर या चित्रपटाचा ये ना जरा या पहिल्या गाण्याचा व्हिडीयोदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

The first song of Lost and Found movie is displayed | लॉस्ट आणि फाऊंड चित्रपटाचे पहिले गाणे प्रदर्शित

लॉस्ट आणि फाऊंड चित्रपटाचे पहिले गाणे प्रदर्शित

िनेता सिध्दार्थ चांदेकर व अभिनेत्री स्पृहा जोशी या जोडीचा आगामी मराठी चित्रपट लॉस्ट अँड फाऊंड या चित्रपटाचे पहिले गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. या चित्रपटाच्या सुंदर टिझर, ट्रेलरने आधीच प्रेक्षकांचं मन जिंकलेआहे. आता सोशल मिडीयावर या चित्रपटाचा ये ना जरा या पहिल्या गाण्याचा व्हिडीयोदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. ये ना जरा बोलना...काहीतरी सांग ना... चाहूल या मनाची ऐकना.. हे गाणं नक्कीच  प्रत्येकाला प्रेमात पाडणार आहे. हे गाणे सोनिया मुंढे आणि शुभांकर शेंबेकर यांनी गायलं असून शुभांकर शेंबेकरनेच या गाण्याला संगीत दिले आहे. तर डॉ. राहुल देशपांडे यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत.


Web Title: The first song of Lost and Found movie is displayed