​‘मधू इथे अन् चंद्र तिथे’ चं पहिले पोस्टर आऊट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2016 19:14 IST2016-04-22T13:44:54+5:302016-04-22T19:14:54+5:30

‘मधू इथे अन् चंद्र तिथे...’ हे गाणं सर्वज्ञातच आहे. याबद्दल वेगळं सांगण्याची गरज नाही. मधुचंद्र ही प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाची ...

The first poster-out in 'Madhu here and moon there' | ​‘मधू इथे अन् चंद्र तिथे’ चं पहिले पोस्टर आऊट

​‘मधू इथे अन् चंद्र तिथे’ चं पहिले पोस्टर आऊट

धू इथे अन् चंद्र तिथे...’ हे गाणं सर्वज्ञातच आहे. याबद्दल वेगळं सांगण्याची गरज नाही. मधुचंद्र ही प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाची घटना असते. पण मधू इथे अन् चंद्र तिथे अशी अवस्था झाल्यावर काय धमाल घडते ह्यावर आधारित ‘मधू इथे अन् चंद्र तिथे’ हा विनोदी रोमॅण्टीक सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. नुकतच या सिनेमाचं फर्स्ट पोस्टर उलगडलं. 

या सिनेमाचे दिग्दर्शन सजय झंकार ह्यांनी केलं असून सिनेमाच्या निर्मितीची धुरा रत्नाकर जगताप यांनी सांभाळली आहे. सिनेमात भाऊ कदम, विशाखा सुभेदार, आनंद इंगळे या कलाकारांसह नवोदित नायक-नायिकेची जोडी झळकणार आहे. 
हा चित्रपट येत्या १२ जून रोजी प्रदर्शित होत आहे. 

Web Title: The first poster-out in 'Madhu here and moon there'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.