अमेरिकेत शूट झालेला पहिला मराठी चित्रपट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2016 14:01 IST2016-09-19T08:31:50+5:302016-09-19T14:01:50+5:30
प्रियांका लोंढे मराठी चित्रपट आज खºया अर्थाने ग्लोबल झाला असे आपण म्हणू ...

अमेरिकेत शूट झालेला पहिला मराठी चित्रपट
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">प्रियांका लोंढे
मराठी चित्रपट आज खºया अर्थाने ग्लोबल झाला असे आपण म्हणू शकतो. त्याला कारणही तसेच आहे म्हणा, सातासमुद्रापार आपल्या मराठी चित्रपटांनी झेंडा फडकविला आहे. अनेक अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपटांची दखल घेतली जातेय. एवढेच नाही तर मराठी सिनेमांचे अनेक शोज देखील परदेशात होऊ लागले आहेत. एवढे सगळे असताना, मराठी चित्रपटात अगदी टिपिकल लोकेशन्स दाखविली जातात अशी ओरड नेहमीच ऐकायला मिळते. मग त्याला कारणेही अनेक असतात म्हणा, कधी बजेटमुळे सेटवरच स्विझिर्लंड उभारले जाते. परंतू अलिकडे मराठी चित्रपटांची चित्रीकरणे परदेशात होऊ लागली आहेत. मराठी सिनेमा जसा जागतिक स्तरापर्यंत पोहचला तसे निर्मात्यांनी देखील चित्रपटांचे शूटिंग परदेशी करण्यासाठी खिसा रिकामा केला. आता हेच पाहा ना अभिनेत्री मीना नेरूरकर दिग्दर्शीत अ डॉट कॉम मॉम या चित्रपटाचे चित्रीकरण थेट अमेरिकेत करण्यात आले आहे. बरं तुम्हाला वाटेल की, चित्रपटातील एखाद दुसरा सीन किंवा एखादे गाणे तिकडे शूट झाले असेल. तर तसे बिलकुलच नाहीये. हा संपुर्ण चित्रपट अमेरिकेत चित्रीत झालाय. एवढेच नाही तर अमेरिकेतल्या व्हाईट हाऊस समोर या चित्रपटातील काही सीन्सचे शूटिंग करण्यात आले आहे. अमेरिकेतील हाय प्रोफाईल आणि कडक बंदोबस्त असलेल्या व्हाऊट हाऊस समोर चित्रीकरण केलेला हा मराठीतील पहिलाच चित्रपट असल्याचे अभिनेत्री मीना नेरूरकर यांनी लोकमत सीएनएक्सशी बोलताना सांगितले. अमेरिकेतील लोक त्यांच्या कामात एवढे व्यस्त असतात की त्यांना रस्त्यावर शूटिंग सुरू असले तरी ते पाहायला वेळ नसतो. तुमच्याकडे कोणीही गर्दी करून पाहत नाही. त्यामूळे आम्हाला तिथे चित्रीकरण करण्यासाठी फारच सोपे गेले असेही त्या म्हणाल्या. या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना खरीखूरी अमेरिका आणि व्हाईट हाऊस लवकरच पाहायला मिळणार आहे.