रेट्रो पोस्टर असणारा पहिलाच मराठी चित्रपट डिस्को सन्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2016 19:17 IST2016-08-02T13:47:52+5:302016-08-02T19:17:52+5:30

 चित्रपटाचे पोस्टर जास्तित जास्त लोकांनी पहावे यासाठी चित्रपटाचे निमार्ते त्या चित्रपटातील सर्व कलाकारांना त्यांच्या लूकमध्ये झळकविण्याचा प्रयत्न करतात. मात्र, ...

The first Marathi movie of the Retro Poster, Disco Studios | रेट्रो पोस्टर असणारा पहिलाच मराठी चित्रपट डिस्को सन्या

रेट्रो पोस्टर असणारा पहिलाच मराठी चित्रपट डिस्को सन्या

 
ित्रपटाचे पोस्टर जास्तित जास्त लोकांनी पहावे यासाठी चित्रपटाचे निमार्ते त्या चित्रपटातील सर्व कलाकारांना त्यांच्या लूकमध्ये झळकविण्याचा प्रयत्न करतात. मात्र, पोस्टरमध्ये असे काहीही न करता केवळ चित्रपटाची कथा आणि आशय पाहून रेट्रो पोस्टर तयार करणारा डिस्को सन्या हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. विशेष म्हणजे बॉलिवूडमधील रईसचे पोस्टर तयार करून त्यावर व्हेरी व्हेरी कुल...थँक यूअशी शाहरूख खानची वाहवा मिळविलेले मराठमोळे पोस्टर डिझायनर राजेश घाडीगावकर यांनी डिस्को सन्याचे पोस्टर तयार केले आहे. या पोस्टरवर ना कोणता चॉकलेट हिरो, ना कोणती फिटनेसही न राखू शकलेली हिरोईन...मात्र या पोस्टरवर डिस्को सन्याच्या अनोख्या विश्वाचा अंदाज येईल अशी कलाकृती करून प्रेक्षकांना आकर्षित करण्यात आले आहे. फुटपाथवर राहणाºया एका खट्याळ मुलाच्या जय चिंगाबुंगा स्पिरीटची कहाणी मनोरंजनाच्या माध्यमातून सांगून प्रेक्षकांमधली माणूसकी जागी करणारा डिस्को सन्या ५ आॅगस्ट रोजी भेटीला येणार असून सर्व प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

Web Title: The first Marathi movie of the Retro Poster, Disco Studios

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.