Video: मराठी अभिनेत्याच्या मुंबईतील फ्लॅटला भीषण आग, अख्खं घर जळून खाक, थोडक्यात वाचला जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 13:16 IST2025-12-25T13:15:42+5:302025-12-25T13:16:26+5:30
प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या मुंबईतील फ्लॅटला भीषण आग लागली आहे. या आगीत अभिनेत्याचं घर जळून खाक झालं आहे. याचा व्हिडीओ समोर आला असून अभिनेत्याने हळहळ व्यक्त केली आहे.

Video: मराठी अभिनेत्याच्या मुंबईतील फ्लॅटला भीषण आग, अख्खं घर जळून खाक, थोडक्यात वाचला जीव
मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या मुंबईतील फ्लॅटला भीषण आग लागली आहे. या आगीत अभिनेत्याचं घर जळून खाक झालं आहे. याचा व्हिडीओ समोर आला असून अभिनेत्याने हळहळ व्यक्त केली आहे. मराठी अभिनेतापुष्कर जोगच्या मुंबईतील फ्लॅटमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने यामध्ये पुष्करच्या कुटुंबीयांपैकी कोणालाही दुखापत झालेली नाही आणि त्याचं कुटुंब सुखरुप आहे.
पुष्कर जोगने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्याचं घर आगीच्या भक्ष्यस्थानी आल्याचं दिसत आहे. घरातील सामान जळून खाक झाल्याचंही पाहायला मिळत आहे. "रिअल लाइफ हिरो अग्निशामक दलाचे फायटर्स, बीएमसी आणि मुंबई पोलीस यांच्यामुळे जीव वाचला. माझं घर गेलं", असं कॅप्शन देत पुष्करने हळहळ व्यक्त करत व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ पाहून आग किती भीषण होती, याचा अंदाज लावता येतो. पुष्करच्या या व्हिडीओवर कमेंट करत सेलिब्रिटी आणि चाहत्यांना चिंता व्यक्त केली आहे.
काही दिवसांपूर्वीच शिव ठाकरेच्या मुंबईतील घरीदेखील शॉर्टसक्रिटमुळे अशीच आग लागली होती. सुदैवाने अग्निशमन दल वेळेत पोहोचल्याने अनर्थ टळला होता. त्यावेळी शिव ठाकरेही घरी होता. मात्र त्याची सुखरूप सुटका झाली. शिवचं घरही आगीत जळून खाक झालं होतं. त्यांच्या घरातील सामानाचंही प्रचंड नुकसान झालं होतं.