अखेर स्वप्निलने गुपित उलगडले

By Admin | Updated: May 27, 2016 02:23 IST2016-05-27T02:23:18+5:302016-05-27T02:23:18+5:30

सध्या ‘लाल इश्क’ या चित्रपटाचा रंग सर्वांवरच चढलेला दिसत आहे. संजय लीला भन्साळी यांचा पहिला मराठी सिनेमा म्हणून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचलीच आहे; परंतु चित्रपटाचे

Finally Swapnilan revealed the secret | अखेर स्वप्निलने गुपित उलगडले

अखेर स्वप्निलने गुपित उलगडले

सध्या ‘लाल इश्क’ या चित्रपटाचा रंग सर्वांवरच चढलेला दिसत आहे. संजय लीला भन्साळी यांचा पहिला मराठी सिनेमा म्हणून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचलीच आहे; परंतु चित्रपटाचे प्रोमो पाहता, हा रोमँटिक थ्रिलर आहे, हे समजून येते. आता स्वप्निलला पडद्यावर हीरोईन्ससोबत रोमान्स करताना पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या समोर त्याचे खलनायकी रूप येणार का, अशी सध्या चर्चा होती. लाल इश्कच्या टीमनेदेखील याबद्दल काही सांगितले नव्हते. पण, आता खुद्द स्वप्निलनेच ‘सीएनएक्स’ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत हे गुपित अखेर उलगडले आहे. स्वप्निल म्हणाला की, ‘लाल इश्क’ ही एकदम भन्नाट मिस्ट्री आहे. आपण अनेक रहस्यमय कथा पाहतो किंवा कोणत्याही मर्डर मिस्ट्रीमध्ये आपल्याला कोणी खून केलाय, हे शोधायचे असते. पण, यामध्ये नक्की कोणाचा खून झालाय, हेच कळत नाही. प्रत्येक पात्र तुम्हाला समोर दिसत राहते; मग असे
होते की अरे मग मर्डर झालाय तरी कोणाचा? आधी खून कोणाचा झालाय, हे यामध्ये शोधावे लागते अन् मग त्याच्यातच उत्तर दडलेय की, तो खून कोणी केलाय? अशा प्रकारची एक युनिक मिस्ट्री यामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दर १५ मिनिटांनी चित्रपटात सस्पेन्स येतो. अंजना ही माझी हीरोईन जरी यामध्ये दिसत असली, तरी तिचे कॅरेक्टर नक्की काय आहे, हे शेवटपर्यंत समजत नाही. कारण यामध्ये या दोघांचे प्रेमप्रकरण सुरू आहे; मग हे दोघे एकमेकांना फसवताहेत की शेवटी आॅडियन्सला अन् मग पुढे काय होतंय
ते पाहायला लागेल. स्वप्निलने तर या मर्डर मिस्ट्रीचे बऱ्यापैकी गुपित उलगडलेच आहे. आता चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच ‘लाल इश्क’चे हे गुपित प्रेक्षकांच्या समोर येईल.

Web Title: Finally Swapnilan revealed the secret

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.