​अभिजीत चव्हाण झळकणार इरफान खानसोबत रायता या चित्रपटात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2017 11:15 AM2017-06-08T11:15:27+5:302017-06-08T16:45:27+5:30

अभिजीत चव्हाणने शान, गोजिरी, माझे नाव शिवाजी यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. कॉमेडी एक्सप्रेस या कार्यक्रमातील त्याची कॉमेडी तर ...

In the film Raiyata with Irrfan Khan, Abhijeet Chavan will be seen | ​अभिजीत चव्हाण झळकणार इरफान खानसोबत रायता या चित्रपटात

​अभिजीत चव्हाण झळकणार इरफान खानसोबत रायता या चित्रपटात

googlenewsNext
िजीत चव्हाणने शान, गोजिरी, माझे नाव शिवाजी यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. कॉमेडी एक्सप्रेस या कार्यक्रमातील त्याची कॉमेडी तर प्रेक्षकांना खूपच आवडते. त्याचे कॉमेडी टायमिंग खूपच चांगले आहे. त्याने मराठीसोबत अनेक हिंदी चित्रपटातदेखील काम केले आहे. स्पिल्ट वाइल्ड ओपन, आप का सुरूर यांसारख्या चित्रपटांमध्येदेखील तो झळकला आहे. 
आता अभिजीत आणखी एका हिंदी चित्रपटात झळकणार असून या चित्रपटात त्याच्यासोबत अनेक प्रसिद्ध कलाकार आहेत. अभिनय देव रायता या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून या चित्रपटात अभिजीत एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे आणि या चित्रपटात तो इरफान खानसोबत काम करत आहे. इरफानसारख्या दिग्ग्ज अभिनेत्यासोबत काम करायला मिळत असल्याने तो सध्या खूपच खूश आहे. त्याने फेसबुक या सोशल नेटवर्किंगद्वारे त्याच्या या नव्या चित्रपटाविषयी सांगितले आहे. त्याने इरफानसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे आणि त्यात म्हटले आहे की, अभिनय देहबोलीतून अत्यंत सूक्ष्म रूपात कसा प्रकट करायचा हे इरफान खानचे कसब आहे. प्रेक्षकांचे लक्ष स्वतःकडे वळवून आणि खिळवून ठेवण्याची त्याच्यात ताकद आहे. यामुळे मी त्याच्या प्रेमातच पडलो आहे. त्याच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करण्याचे माझे स्वप्न नुकतेच पूर्ण झाले. अभिनय देव दिग्दर्शित रायता हा चित्रपट करताना इरफानसोबत काम करण्याची संधी मिळाली. हे क्षण पुन्हा पुन्हा येवोत अशी अपेक्षा.
अभिजीतने इरफानची स्तुती करणारी ही पोस्ट फेसबुकला पोस्ट करत इरफानसोबतचा एक सेल्फीदेखील अपलोड केला आहे. या सेल्फीविषयी देखील त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे, मी सेल्फी मागितल्यावर झोपलेला इरफान टणकन उडी मारून बसला आणि त्याने मनापासून सेल्फी दिला. 

Web Title: In the film Raiyata with Irrfan Khan, Abhijeet Chavan will be seen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.