गेला उडत नाटकाची पन्नाशी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2016 10:08 AM2016-08-12T10:08:47+5:302016-08-12T15:38:47+5:30

सिध्दार्थ जाधव याच्या गेला उडत या नाटकाची धूम संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे. सिध्दू आपल्या अभिनयाने रंगभूमीवर देखील प्रेक्षकांच्या मनावर राज्य ...

Fifty-five plays | गेला उडत नाटकाची पन्नाशी

गेला उडत नाटकाची पन्नाशी

googlenewsNext
ध्दार्थ जाधव याच्या गेला उडत या नाटकाची धूम संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे. सिध्दू आपल्या अभिनयाने रंगभूमीवर देखील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. त्याचे गेला उडत हे नाटक सध्या महाराष्ट्रात हाउसफुल चालले आहे. त्यामुळे अभिनेता सिध्दार्थ जाधव भलत्याच आनंदात दिसत आहे. याविषयी लोकमत सीएनएक्सशी बोलताना सिध्दार्थ जाधव म्हणाला, गेला उडत हे नाटक हाउसफुल चालल्याने मी खूप आनंदात आहे. प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमामुळे आज आमच्या नाटकाचे पन्नास प्रयोग पूर्ण होत आहे. यामुळे गेला उडतची पूर्ण टीमच आनंदात आहे. प्रसाद कांबळी प्रस्तुत भद्रकाली प्रॉडक्शनची ५३ वी नाट्यकृती असणारे हे नाटक आहे. केदार शिंदे लिखित-दिग्दर्शित गेला उडत या नाटकाचा पहिला प्रयोग १३ मे रोजी होता. आता या नाटकाने ४८ प्रयोग पूर्ण केले आहेत. विशेष म्हणजे या नाटकाचा पहिला प्रयोग दादर येथील शिवाजी नाट्य मंदिर येथे झाला आणि ५० वा प्रयोग देखील १४ आॅगस्ट रोजी शिवाजी मंदिर येथेच होणार आहे.  

Web Title: Fifty-five plays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.