'फॅन्ड्री' फेम शालू उर्फ राजेश्वरी खरात पडली प्रेमात?, व्हिडीओ शेअर करत म्हणाली..

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 16:19 IST2021-08-09T16:18:26+5:302021-08-09T16:19:12+5:30

शालू म्हणजेच राजेश्वरी खरात खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे. बऱ्याचदा तिचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात.

'Fandry' fame Shalu alias Rajeshwari fell in love ?, she said while sharing the video .. | 'फॅन्ड्री' फेम शालू उर्फ राजेश्वरी खरात पडली प्रेमात?, व्हिडीओ शेअर करत म्हणाली..

'फॅन्ड्री' फेम शालू उर्फ राजेश्वरी खरात पडली प्रेमात?, व्हिडीओ शेअर करत म्हणाली..

नागराज मंजुळेच्या फॅन्ड्री या चित्रपटात शालूच्या भूमिकेतून अभिनेत्री राजेश्वरी खरात नावारुपाला आली. तिने साकारलेली शालूची भूमिका रसिकांना चांगलीच भावली होती. शालू म्हणजेच राजेश्वरी खरात खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे. सध्या ती तिच्या चित्रपटांपेक्षा सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असते. तिचे फॅन फॉलोव्हिंगदेखील जास्त आहे. त्यामुळे तिचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. दरम्यान तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. यात ती प्रेमात पडल्याचे सांगताना दिसते आहे. 

राजेश्वरी खरात हिने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात ती डान्स स्टेप करताना दिसते आहे. या व्हिडीओत राजश्रीने व्हाइट रंगाचा शॉर्ट स्लिव्हलेज ड्रेस परिधान केला आहे. या व्हिडीओत ती चोरी चोरी सपनों में आता है कोई या गाण्यावर थिरकताना दिसते आहे. हा व्हिडीओ शेअर करून तिने लिहिले की, मुझे प्यार हो गया.

तिचा हा व्हिडीओ चाहत्यांना खूप भावतो आहे. तिच्या या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतो आहे. 


राजेश्वरी खरातने नागराज मंजुळेच्या फॅन्ड्री या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटातून तिला खूप लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तिने आयटमगिरी सिनेमात काम केला.

तसेच काही दिवसांपूर्वी तिचा आगामी चित्रपट रेडलाइटचे पोस्टर रिलीज झाले आहे. हा चित्रपट वैश्या व्यवसायावर आधारीत आहे. तिचे चाहते तिच्या या चित्रपटाबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत. 

Web Title: 'Fandry' fame Shalu alias Rajeshwari fell in love ?, she said while sharing the video ..