"अलिबागवरुन पनवेलला जाताना वडखळला माणूस नव्याचा जुना होतो", सिद्धार्थच्या 'त्या' पोस्टवर चाहत्याची भन्नाट कमेंट, अभिनेत्यालाही हसू आवरेना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 10:53 IST2023-11-02T10:52:26+5:302023-11-02T10:53:16+5:30
सिद्धार्थच्या पोस्टवर चाहत्याची कमेंट, अभिनेता उत्तर देत म्हणाला...

"अलिबागवरुन पनवेलला जाताना वडखळला माणूस नव्याचा जुना होतो", सिद्धार्थच्या 'त्या' पोस्टवर चाहत्याची भन्नाट कमेंट, अभिनेत्यालाही हसू आवरेना
सिद्धार्थ चांदेकर हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. सिद्धार्थने आजवर अनेक मालिका आणि चित्रपटांत काम करून अभिनयाचा ठसा उमटवला. 'अग्निहोत्र' मालिकेतून घराघरात पोहोचलेला सिद्धार्थ नंतर 'झेंडा', 'क्लासमेट', 'रणांगण', 'लग्न पाहावे करुन', 'गुलाबजाम' अशा चित्रपटांत महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसला. सिद्धार्थ सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबद्दल तो चाहत्यांना पोस्टद्वारे माहिती देत असतो.
सिद्धार्थने नुकतीच त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक फोटो शेअर केला होता. या फोटोला त्याने "कबीर म्हणतो, प्रवासात माणूस जुन्याचा नवा होतो. तुमचा असा एखादा ‘नवा’ करुन टाकणारा प्रवास सांगा की आणि please आयुष्याचा प्रवास वगैरे उत्तर देऊ नका..", असं कॅप्शन दिलं होतं. सिद्धार्थच्या या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी कमेंट करत त्यांच्या प्रवासाच्या आठवणी सांगितल्या. एका चाहत्याने त्याच्या या फोटोवर कमेंट करत "अलिबाग वरून पनवेल ला जाताना वडखळ ला माणूस नव्याचा जुना पण होतो," असं म्हटलं आहे. चाहत्याची ही कमेंट वाचून सिद्धार्थलाही हसू अनावर झालं आहे. सिद्धार्थने या चाहत्याच्या कमेंटला रिप्लाय देत हसण्याचे इमोजी पोस्ट केले आहेत.
दरम्यान, सिद्धार्थ मराठी कलाविश्वातील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. सिद्धार्थने २०२१ साली अभिनेत्री मिताली मयेकरशी लग्नगाठ बांधत संसार थाटला. सिद्धार्थ आणि मिताली हे कलाविश्वातील लोकप्रिय जोडपं आहे. अनेकदा ते एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करताना दिसतात.