Exculsive - अतुल करणार 'हवा आणि उशी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2016 12:12 IST2016-09-21T06:40:50+5:302016-09-21T12:12:25+5:30

 बेनझीर जमादार 'गणवेश' या चित्रपटातून अतुल जगदाळेने आपल्या दिग्दर्शनाची जादू प्रेक्षकांना दाखविली आहे. गणवेशसारख्या संवेदनशील आणि सामाजिक विषय असलेल्या ...

Exculsive - Atul will 'air and cushion' | Exculsive - अतुल करणार 'हवा आणि उशी'

Exculsive - अतुल करणार 'हवा आणि उशी'

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">
 बेनझीर जमादार

'गणवेश' या चित्रपटातून अतुल जगदाळेने आपल्या दिग्दर्शनाची जादू प्रेक्षकांना दाखविली आहे. गणवेशसारख्या संवेदनशील आणि सामाजिक विषय असलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन केल्यानंतर अतुल हटके लव्हस्टोरीकडे वळला आहे. त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव 'हवा आणि उशी' असल्याचे अतुलने लोकमत सीएनएक्सशी बोलताना सांगितले. सैराटमुळे सध्या प्रेक्षक लव्हस्टोरी पाहणे अधिक पसंत करत आहे. माझी ही लव्हस्टोरी एकदम वेगळी  आहे, याची कल्पना तुम्हाला चित्रपटाच्या नावावरुन आलीच असले. या चित्रपटाच्या हटके नावातच चित्रपटाचा आशय असल्याचे दिग्दर्शकाने म्हटले आहे. या चित्रपटात मराठी सिनेसृष्टीतला आघाडीचा अभिनेता असणार आहे. त्याच नाव मात्र अजून गुलदस्त्यात आहे. हा चित्रपट 2017 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Web Title: Exculsive - Atul will 'air and cushion'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.