Vaidehi Parashurami : स्टार यूट्युबर यशराज मुखाटेसोबत खरंच अफेअर सुरूय?; वैदेही परशुरामीने 'क्लिअर कट' सांगून टाकलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 13:50 IST2023-02-06T13:49:15+5:302023-02-06T13:50:25+5:30
Vaidehi Parashurami : अफेअर्सच्या चर्चांवर वैदेहीने केला खुलासा...

Vaidehi Parashurami : स्टार यूट्युबर यशराज मुखाटेसोबत खरंच अफेअर सुरूय?; वैदेही परशुरामीने 'क्लिअर कट' सांगून टाकलं
आपला दमदार अभिनय आणि सोज्वळ सौंदर्याने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे वैदेही परशुरामी (Vaidehi Parashurami). लवकरच ती अमेय वाघसोबत 'जग्गू आणि जुलिएट' (Jaggu Ani Juliet) या सिनेमात झळकतेय. सध्या वैदेही या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. हीच वैदेही काही दिवसांपूर्वी तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आली होती. तिच्या अफेअरच्या बातम्या जोरात होत्या. होय, 'रसोडे मे कौन था' या गाण्याने देशभरात धुमाकूळ घालणारा, पारंपारिक संगीताला रंजक साज चढवणारा कलाकार म्हणून लोकप्रिय असलेल्या यशराज मुखाटे (Yashraj Mukhate) याच्यासोबत वैदेहीचं नाव जोडलं गेलं होतं. वैदेही व यशराज एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा होती. आता या चर्चांना खुद्द वैदेहीने उत्तर दिलं आहे. 'लोकमत फिल्मी'च्या पंचायत या कार्यक्रमात वैदेही यावर स्पष्टच बोलली.
काय म्हणाली वैदेही...?
यशराज मुखाटेसोबत तुझ्या लिंकअपच्या बातम्या आहेत, त्यावर काय सांगशील? असा प्रश्न तिला मुलाखतीत विचारण्यात आला. यावर वैदेहीने काहीशा त्रासिक स्वरात उत्तर दिलं. यशराज मुखाटे ज्या व्यक्तिला मी आयुष्यात एकदा भेटलेय आणि त्याच्याबरोबर लिंक होतेय मी... हे ऐकून खरंच मला आनंद होतोय, असं ती उपरोधिकपणे म्हणाली.
यशराज व मी आयुष्यात फक्त एकदा भेटलेलो. तेही कुठल्या स्क्रिनिंगला. हाय मी वैदेही, हाय मी यशराज... इतकीच आमची भेट झालेली आहे. त्या भेटीत आमच्यात केवळ एक संवाद झाला होता. तू खूप छान काम करतोस, असं मी त्याला म्हणाले होते आणि मला पण तुझं काम खूप आवडतं, असं तो म्हणाला होता. यशराजने एक Q and A इन्स्टावर केला होता. तुझा सध्याचा क्रश कोण आहे? असा प्रश्न त्याला यावेळी विचारण्यात आला होता. त्याने काही दोन-तीन नावं घेतली होती आणि त्यातलं एक नाव माझं होतं. या सगळ्याची सुरूवात इथून झाली होती. मी त्याला ओळखतही नाही, त्यामुळे मी त्याच्या प्रेमात आहे हे ठरवणाऱ्या लोकांनी कृपा करून मला येऊन भेटा. खरं तर मला आवडेल प्रेमात पडायला. कारण मी सिंगल आहे, असं तिने स्पष्ट केलं.