Exclusive सई झाली वायझेड
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2016 13:19 IST2016-06-28T07:48:02+5:302016-06-28T13:19:08+5:30
सई ताम्हणकर वायझेड झालीय हे ऐकुन आश्चर्य वाटलं ना. आता तुम्ही म्हणाल सईला अस झालय तरी काय. तर फार विचारात पडु नका, भुवया उंचावू नका. सईचा वायझेड नावाचा चित्रपट येत आहे अन या चित्रपटाचा टीझर नूकताच लाँच करण्यात आलाय. या टिझरमध्ये वायझेड सईचा एकदम कडक अन हटके अंदाज आपल्याला पहायला मिळतोय.
.jpg)
Exclusive सई झाली वायझेड
प्रियांका लोंढे
सई ताम्हणकर वायझेड झालीय हे ऐकुन आश्चर्य वाटलं ना. आता तुम्ही म्हणाल सईला अस झालय तरी काय. तर फार विचारात पडु नका, भुवया उंचावू नका. सईचा वायझेड नावाचा चित्रपट येत आहे अन या चित्रपटाचा टीझर नूकताच लाँच करण्यात आलाय. या टिझरमध्ये वायझेड सईचा एकदम कडक अन हटके अंदाज आपल्याला पहायला मिळतोय. मराठी इंडस्ट्रीतील आपली ही हॉट अभिनेत्री या टिझरमध्ये अस्सल गावरान ठसकेबाज लुकमध्ये दिसत आहे. डार्क पिंक कलरची नऊवारी, नाकात नथ, कपाळी चंद्रकोर, गळ््यात मोत्याची माळ अशा लुकमध्ये सजलेली सई प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. आता तुम्ही म्हणाल यात काय नवीन आहे, तर ही वायझेड सई आपल्याला वेगळ््या अंदाजात दिसणार आहे म्हणजेच डोळ््यावर भलामोठा चश्मा अन हातात बॉक्सींग ग्लोव्ज घातलेली सई तुम्ही नक्कीच याआधी पाहिली नसेल तर तयार रहा नव्या अंदाजातील या वायझेड टिमला भेटायला. सागर देशमुख, सई ताम्हणकर, पर्ण पेठे, अक्षय टंकसाळे यांनी साकारलेल्या आगळ्या-वेगळ्या नावाच्या भूमिका म्हणजे अबब, पर्णरेखा, अंतरा आणि बत्तीस प्रेक्षकांना नक्कीच वेडे करुन सोडतील. एवरेस्ट एंटरटेनमेंट आणि प्रतिसाद प्रॉडक्शन्स प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर विद्वांसने केले आहे तर कथा क्षितीज पटवर्धनने लिहिली आहे. येत्या १२ आॅगस्टला वायझेड संपूर्ण महाराष्ट्राला वायझेड करण्यासाठी सज्ज होणार आहे.