Exclusive हटके नात्यांची अनोखी गुंफण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2016 17:44 IST2016-07-15T12:04:21+5:302016-07-15T17:44:40+5:30

 प्रियांका लोंढे    आई-मुलीचे हळुवार नाते, सासु सुनेचे खट्टे-मिठ्ठे नाते तर बहिण भावाचे भावनिक नाते. अशा सर्वच नात्यांची अनोखी ...

Exclusive Hughes | Exclusive हटके नात्यांची अनोखी गुंफण

Exclusive हटके नात्यांची अनोखी गुंफण

 
m>प्रियांका लोंढे

   आई-मुलीचे हळुवार नाते, सासु सुनेचे खट्टे-मिठ्ठे नाते तर बहिण भावाचे भावनिक नाते. अशा सर्वच नात्यांची अनोखी गुंफण सखींनी अनोख्या रितीने मांडली. मेरी मा.. ममा या गाण्यावर डान्स करताना आई अन मुलीची बाँडिग पाहताना मनाला चटका लागला तर सासु-सुनेची गमतीदार केमिस्ट्री पाहताना सखींना हसु अनावर झाले. या सर्व नात्यांची तरलता अनुभवता आली लोकमत सखींच्या जरा हटके या स्पर्धेमध्ये.
                 लोकमत सखी मंच आयेजीत, उत्सव क्रिएशन प्रस्तुत, ओसवाल ज्वेलर्सच्या सहयोगाने आयोजित जरा हटके फॅमिली स्पर्धेचे पुष्पमंगल कार्यालय येथे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला सखींनी उत्स्फुर्त प्रतिसाद तर दिलाच परंतू यामध्ये सहभागी होऊन डान्स अन नाटकाच्या माध्यामातून वेगवेगळ््या नात्यांची पेशकश देखील केली. यावेळी, अ‍ॅन्ड जरा हटके या चित्रपटाची टिम उपस्थित होती. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, शिवानी रांगोळे, सिद्धार्थ मेनन, दिग्दर्शक प्रविण कुंटे, निर्माते रवी जाघव, निर्मात्या क्रिशिका लुल्ला, उत्सव क्रिएशनचे डिरेक्टर गोविंद कलंत्री (एक्सक्लुझिव्ह सारी मॉल फॉर वूमेन अ‍ॅट बिबवेवाडी), ओसवाल जेवेलर्सचे पवन ओसवाल, समुपदेशक गौरी तटके, अनुरुप विवाह संस्थेच्या संचालिका गोरी कानिटकर उपसथित होते.


                         
           ................................................................
   
     मराठी सिनेमा आज ग्लोबल झाला आहे. मराठी चित्रपटाचा आशय दर्जेदार असल्याने मला मराठी चित्रपट करण्यासाठी तयार झाले. अ‍ॅन्ड जरा हटके या चित्रपटाची कथा मला आवडली. अगदी छोट्या शहरात देखील अशा गोष्टी घडत असतात. प्रत्येकाचेच प्रेम अन इमोशन सेम असतात. 
                                             - क्रिशिका लुल्ला (निर्मात्या)
..............................................................................................

     आपल्या आजुबाजुलाच घडणाºया गोष्टींपेकी हा सिनेमा आहे. जग जवळ येतय अन नव्या जगाकडे पाहण्याचा समाजाचा नवा दृष्टीकोन असायलाच हवा. बदलणारी नाती स्वीकारायला हवीत. अशाच हटके नात्यांची ही गोष्ट आहे. 
                                               - रवी जाधव (दिग्दर्शक )
............................................................................................

Web Title: Exclusive Hughes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.