Exclusive जब्याची शाली करणार अ‍ॅटमगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2016 15:52 IST2016-07-08T10:22:30+5:302016-07-08T15:52:30+5:30

   प्रियांका लोंढे                 फॅन्ड्री या चित्रपटातील जब्याची शाली आठवतेय का तुम्हाला. ...

Exclusive Exclamation Atlg | Exclusive जब्याची शाली करणार अ‍ॅटमगिरी

Exclusive जब्याची शाली करणार अ‍ॅटमगिरी

 
r /> प्रियांका लोंढे
                फॅन्ड्री या चित्रपटातील जब्याची शाली आठवतेय का तुम्हाला. एक साधी सालास मुलगी जिच्यावर काळ््या चिमणीची राख उडवण्यासाठी जीवाचा आटापीटा करणारा जब्या तर सर्वांच्याच लक्षात राहिला होता. पण चित्रपटात जिच्या वाट्याला एकही डायलॉग आला नव्हता ती जब्याची शाली म्हणजेच अभिनेत्री राजेश्वरी खरात. नागराज मंजुळे यांनी तीला फॅन्ड्रीत चान्स तर दिला पण संवाद काही वाट्याला आले नाहीत. आता ही गावरान शाली सर्वांनाच डायरेक्ट अ‍ॅटमगिरी करतानाच तुम्हाला दिसणार आहे. एक हटके प्रेमकथा असणारा अ‍ॅटमगिरी नावाच्या सिनेमात राजेश्वरी दमदार भुमिका करताना तिच्या चाहत्यांना दिसणार आहे. याबद्दल सीएमएक्सला दिलेल्या खास मुलाखतीत राजेश्वरीने अनेक गोष्टी सांगितल्या. ती म्हणाली, अ‍ॅटमगिरी नावाचा एक रोमँटिक चित्रपट मी करीत आहे. ही टिपिकल लवस्टोरी नसुन ती एक हटके प्रेमकथा आहे. एक वेगळ््या प्रकारची भुमिका मला करायला मिळाल्याने मी खुपच आनंदी आहे. फॅन्ड्रीमध्ये मला डायलॉग्ज नव्हते. ज्यावेळी मला लोक म्हणायचे की काय तुला या चित्रपटात संवादच नाहीत ते ऐकुन खरच वाईट वाटायचे पण आता प्रेक्षकांना माझ्या या आगामी चित्रपटात माझा अभिनय पहायला मिळेल. या चित्रपटाची शुटिंग शिरुर येथे झाली असुन यामध्ये हंसराज जगताप माझा हिरो असणार आहे. एवढेच नाही तर नागराज मंजुळे आजही मला चित्रपटांच्या बाबतीत गायडन्स करतात असेही तिने सांगितले. आता पाहुयात नागराजच्या या विद्यार्थिनीची अ‍ॅटमगिरी प्रेक्षकांना किती पसंत पडतीये ती. 

Web Title: Exclusive Exclamation Atlg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.