Exclusive ती आणि इतर कोण आहेत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2016 14:37 IST2016-08-25T09:07:29+5:302016-08-25T14:37:29+5:30
प्रियांका लोंढे वेगळ्या पठडीतील चित्रपट बनवण्यासाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक गोविंद निहलानी यांनी प्रथमच ...

Exclusive ती आणि इतर कोण आहेत?
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;"> प्रियांका लोंढे
वेगळ्या पठडीतील चित्रपट बनवण्यासाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक गोविंद निहलानी यांनी प्रथमच मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाचे नाव ती आणि इतर असल्याचे अभिनेता भूषण प्रधान याने लोकमत सीएनएक्सला सांगितले. या चित्रपटात आपल्याला सुबोध भावे, अमृता सुभाष, सोनाली कुलकर्णी, प्रिया मराठे आणि भूषण प्रधान असे तगडे कलाकार पाहायला मिळणार आहेत. चित्रपटाचे नाव ती आणि इतर असल्याने हा सिनेमा स्त्रीप्रधान आहे का असा प्रश्न आपसूकच उपस्थित होतो. चित्रपटाच्या नावासंदर्भात बोलताना भूषण सांगतो, "सिनेमाचे नाव ती आणि इतर असले तरी यामध्ये ती कोण आणि इतर कोण हे खरे रहस्य आहे. चित्रपट पाहिल्यावरच प्रेक्षकांसमोर ते गुढ उलगडणार आहे. यामध्ये माझी भूमिका बायकोवर वर्चस्व गाजवणाऱ्या पतीची आहे. या चित्रपटात प्रिया मराठेने माझ्या बायकोची भूमिका साकारली आहे. अहंकारामध्ये वाहून गेलेला आणि बायकोला तिचे मत व्यक्त न करू देणाऱ्या पतीची भूमिका साकारण्याचा अनुभव फारच वेगळा होता. सुबोध, अमृता, सोनाली यांसारख्या मोठ्या कलाकारांसोबत काम करताना खूप काही शिकायला मिळाले. तसेच गोविंद निहलानी हे बॉलिवुडमधील नामवंत दिग्दर्शक असले तरीही ते प्रत्येक कलाकाराचा प्रचंड आदर करतात. कलाकारांचे जर काही चुकले तर ते न रागावता शांतपणे समजावून सांगतात. या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून लवकरच प्रेक्षकांना ती आणि इतर कोण आहे हे समजेल."