Exclusive अमितराजने केला स्पेनमध्ये पाऊस एंजॉय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2016 15:42 IST2016-07-15T10:11:09+5:302016-07-15T15:42:35+5:30

प्रियांका लोंढे                 एक से बढकर एक अशी गाणी माराठी इंडस्ट्रीला देणारा ...

Exclusive Amitrase did Rain Inn in Spain | Exclusive अमितराजने केला स्पेनमध्ये पाऊस एंजॉय

Exclusive अमितराजने केला स्पेनमध्ये पाऊस एंजॉय

प्रियांका लोंढे


                एक से बढकर एक अशी गाणी माराठी इंडस्ट्रीला देणारा संगीतकार अमितराज त्याच्या जादुई आवाजामुळे देखील आज प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण करुन आहे. देवा काळजाची हाक सारखी सॅड साँग असुदेत किंवा रखुमाई सारखे गाणे ऐकताना हार्टटचिंग वाटतात. सतत वेगळ््या जॉनर्सची गाणी ट्राय करणाºया अमितने फारच कमी वेळात इंडस्ट्रीत स्वत:ची छाप उमटविली आहे. आता आपला हा पठ्ठ्या नूकताच एका अ‍ॅवॉर्ड फंक्शनसाठी स्पेनला जाऊन आला अन त्याने स्पेनच्या पावसाचा मनसोक्त आनंदही घेतला आहे. झक्कास पैकी रेनकोट घातलेला एक पावसातील फोटो अमितने सोशल साईट्सवर अपलोड केला असुन त्याच्या या फोटोजला अनेक हिट्स मिळत आहेत.

                     

याबद्दल सीएनएक्सला दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितले की, मला पाऊस खुपच आवडतो. मी स्पेनमध्ये असताना पाऊस पडु लागला अन  तो मोमेंट कॅमेरॅत कॅपचर करण्याचा मोह मला आवरता आला नाही. हा फोटो डीओपी महेश लिमये यांनी काढला असल्याने तो फारच स्पेशल असल्याचे अमितने सांगितले. ते काहीही असो पण पावसाचा आनंद घेताना रेनकोटमध्ये काढलेल्या या फोटोत मात्र अमित फारच भारी वाटतोय यात काहीच शंका नाही. 

                  

    

Web Title: Exclusive Amitrase did Rain Inn in Spain