Exculsive समीधाचे 'हे' स्वप्न झाले पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2016 14:47 IST2016-11-08T14:47:15+5:302016-11-08T14:47:15+5:30

      बेनझीर जमादार प्रत्येक कलाकाराचे काही ना काही स्वप्न असते. हे स्वप्न प्रत्यक्षात उतरले तर तो कलाकाराचा ...

Exclsive critique of 'This' dream was completed | Exculsive समीधाचे 'हे' स्वप्न झाले पूर्ण

Exculsive समीधाचे 'हे' स्वप्न झाले पूर्ण

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">      बेनझीर जमादार

प्रत्येक कलाकाराचे काही ना काही स्वप्न असते. हे स्वप्न प्रत्यक्षात उतरले तर तो कलाकाराचा आनंद गगनात मावेनासा होतो. सध्या अशीच काहीशी परिस्थिती अभिनेत्री समीधा गुरूची झाली आहे. अखेर समीधाचे खूप वर्षांपासूनचे स्वप्न पूर्ण झाले आहे. तिच्या या स्वप्नाविषयी समीधा लोकमत सीएनएक्सला सांगते, मराठी इंडस्ट्रीचे दिग्गज कलाकार विक्रम गोखले यांच्यासोबत काम करण्याचे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. आज हेच स्वप्न माझे पूर्ण झाले आहे. मी विक्रम गोखले यांच्यासोबत एका चित्रपटात काम करणार आहे. त्या चित्रपटाचे नाव भिरभिर असे आहे. या चित्रपटात विक्रम गोखले आणि मी मुख्य भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट कौंटुबिक असणार आहे. या चित्रपटात मी एक शहिद जवानाच्या पत्नीची भूमिका साकारत  आहे. प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करणारी ही कथा असणार आहे. विक्रम गोखले यांच्यासोबत मी पहिल्यांदाच काम करत असल्यामुळे याचा मला खूप आनंद होत आहे. त्यांच्याकडून खूप काही शिकण्यास मिळत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश सोमण आणि विवेक वाघ यांनी केले आहेत. सध्या या चित्रपटाचे नाव अदयाप भिरभिर असे ठेवण्यात आले आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण पावसामुळे मध्यंतरी बंद होते. पण आता पुन्हा आमची पूर्ण टीम चित्रपटाचे चित्रिकरणामध्ये व्यग्र आहे. समीधा हिने मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. तसेच तिला कापूसकोंडयाची गोष्ट या चित्रपटासाठी महाराष्ट्र राज्याचा उत्कृष्ट पुरस्कार मिळाला आहे.
 

Web Title: Exclsive critique of 'This' dream was completed