एंटरटेनमेंट ट्रेड अवॉर्ड्स २०१८
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2018 12:01 IST2018-03-31T06:31:11+5:302018-03-31T12:01:11+5:30
भारतीय सैनेला मानवंदना देण्यासाठी “एंटरटेनमेंट ट्रेड अवॉर्ड्स” हा कार्यक्रम २९ मार्च रोजी रंगशारदा सभागृहात आयोजित केला. यावेळी मनोरंजन, क्रीडा, ...
.jpg)
एंटरटेनमेंट ट्रेड अवॉर्ड्स २०१८
भ रतीय सैनेला मानवंदना देण्यासाठी “एंटरटेनमेंट ट्रेड अवॉर्ड्स” हा कार्यक्रम २९ मार्च रोजी रंगशारदा सभागृहात आयोजित केला. यावेळी मनोरंजन, क्रीडा, आरोग्य, शिक्षण, सामाजिक, व्यावसायिक आणि आर्थिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या लोकांना गौरवण्यात आले. एन पी यादव आयोजित या पुरस्काराचे यंदाचे दुसरे वर्ष आहे.
काही खास पुरस्कार विजेते त्यात भारतीय पोलीस खात्यातील शाहिदा परवीन गांगुली, भारतीय बनावटीचे पहिले विमान बनवणारे कॅप्टन अमोल यादव, हरखचंद सावळा जे कर्करोगींसाठी व त्यांच्या कुटुंबासाठी गेले ३ दशके काम करतात तसेच दक्षिण आफ्रिका मध्ये वास्तव्यासाठी असलेले व्यवसायिक रिझवान अदातिया जे जभरातील गरीब मुलांच्या शिक्षणासाठी अथकपणे काम करतात याशिवाय मनोरंजन, क्रीडा, आरोग्य, शिक्षण, सामाजिक, व्यावसायिक आणि आर्थिक क्षेत्रातील मान्यवरांना यावेळी गौरवण्यात आले.
एन पी यादव म्हणाले की, आमचा नेहमी प्रयत्न असतो की, ज्या समाजाने आपल्याला भरभरून दिले त्या समाजाला आपण देणे लागतो आणि त्या प्रित्यर्थ यंदा एंटरटेनमेंट ट्रेड अवॉर्ड्सच्या दुसऱ्या वर्षीही टी फौंडेशनला १००० सॅनिटरी पॅड्स स्त्रियांसाठी देणार आहोत याव्यतिरिक्त आम्ही हेल्पेज इंडिया जे वृद्धांसाठी काम करते तसेच मूहीम हे एनजीओ लिंग समानता साठी काम करते या एनजीओसाठी देणगी देणार आहोत तसेच देशासाठी शहीद सैनिकांच्या दोन मुलांच्या शिक्षणासाठीही मदत करणार आहोत.
पुरस्काराच्या या कार्यक्रमात प्रथमच सैनिकांना सन्मानित करण्यात आले याशिवाय मराठा रेजिमेन्टला २५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आपले सैनिक जे निस्वार्थ पणे दिवस रात्र आपल्यासाठी काम करतात त्यांच्या साठी छोटीशी मानवंदना देण्यात आली, असे एन पी यादव म्हणाले.
एन पी यादव यांच्या “टॉप १० हिरो आणि हिरोइन्स” या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण आले. या वेळी या कलाकारांच्या गाजलेल्या गाण्यांवर सादरीकरून त्याना मानवंदना आली. त्यात प्रसिद्ध नायक मयुरेश पेम, एबिसिडी व डीआयडी चे सुप्रसिद नृत्यदिग्दर्शक सुशांत पुजारी व नायिका मनीषा केळकर व अंकिता तारे याचे सादरीकरण केले. तर सोनाली कुलकर्णी आणि मृणाल कुलकर्णी या सोहळ्याला उपस्थित होत्या.,