यंदा कर्तव्य आहे! सोनाली कुलकर्णी आहे या व्यक्तीसोबत रिलेशनशीपमध्ये?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2020 17:59 IST2020-02-03T17:58:55+5:302020-02-03T17:59:26+5:30

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी लवकरच लग्नबेडीत अडकणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे.

This is the duty this time! Is Sonali Kulkarni in a relationship with this person? | यंदा कर्तव्य आहे! सोनाली कुलकर्णी आहे या व्यक्तीसोबत रिलेशनशीपमध्ये?

यंदा कर्तव्य आहे! सोनाली कुलकर्णी आहे या व्यक्तीसोबत रिलेशनशीपमध्ये?

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री नेहा पेंडसे नुकतीच लग्नबेडीत अडकली. त्यानंतर आज अभिनेत्री मानसी नाईक हिने तिच्या प्रेमाची कबूली देत बॉयफ्रेंडसोबतचा फोटो शेअर केला. त्यानंतर आता एका वेबसाईटच्या वृत्तानुसार, मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीदेखील लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असून ती  कुणाल बेनोडेकर नामक तरूणासोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचे म्हटलं आहे.


अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने ती रिलेशनशीपमध्ये असल्याचे एका मुलाखतीत सांगितलं होतं. मात्र तिने त्या व्यक्तीबद्दल कधीच सांगितले नव्हते. मात्र पिपिंगमूनच्या रिपोर्टनुसार, सोनालीने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमधूनच या गोष्टीचा इशारा देखील दिला आहे.

सोनाली सध्या परदेशात आहे आणि विविध एडवेंचर स्पोर्ट्सही करत आहे. तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओतून रिलेशनशीपचा खुलासा केला आहे. 


सोनालीने व्हिडिओ शेअर करत म्हटलंय की, मी माझ्या नव्या प्रवासाला माझ्या पार्टनरसोबत सुरुवात करते आहे, अॅडव्हेंचरस चढउतारासाठी मी सज्ज आहे. सोनालीने उल्लेख केलेला हा पार्टनर कुणाल बेनोडेकर आहे. या व्हिडिओसोबत तिने त्याला टॅग केले आहे.


रिपोर्टनुसार, कुणाल हा मूळचा लंडनचा आहे. कुणाल हा चार्टर्ड अकाउंटेंट असून दुबईत सिनीयर एडजस्टर म्हणून काम करतो.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोनाली लवकरच कुणालसोबत लग्नबेडीत अडकणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच लग्नानंतर सोनाली दुबईत स्थायिक होणार असल्याचंही बोललं जातंय.

याबाबत सोनाली कधी उघडपणे बोलते हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

Web Title: This is the duty this time! Is Sonali Kulkarni in a relationship with this person?