'झिम्मा २'मधील या सीनच्या शूटवेळी हेमंत ढोमे बसला होता बॅगच्या मागे लपून, वाचा हा इंटरेस्टिंग किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 01:03 PM2023-12-08T13:03:36+5:302023-12-08T13:03:45+5:30

हेमंत ढोमे (Hemant Dhome) दिग्दर्शित 'झिम्मा २' (Jhimma 2) चित्रपट २४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.

During the shooting of this scene in 'jhimma 2' Hemant Dhome was sitting hiding behind a bag, read this interesting story | 'झिम्मा २'मधील या सीनच्या शूटवेळी हेमंत ढोमे बसला होता बॅगच्या मागे लपून, वाचा हा इंटरेस्टिंग किस्सा

'झिम्मा २'मधील या सीनच्या शूटवेळी हेमंत ढोमे बसला होता बॅगच्या मागे लपून, वाचा हा इंटरेस्टिंग किस्सा

हेमंत ढोमे (Hemant Dhome) दिग्दर्शित 'झिम्मा २' (Jhimma 2) चित्रपट २४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. पहिल्या दिवसापासूनच 'झिम्मा २' पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत. सिनेमागृहात 'झिम्मा २'च्या शोला ठिकठिकाणी हाऊसफुलचे बोर्ड लागत आहेत. दरम्यान आता दिग्दर्शक हेमंत ढोमे याने इंस्टाग्रामवर झिम्मा २च्या एका सीनवेळचा गमतीशीर किस्सा सांगितला आहे.

हेमंत ढोमेने झिम्मा २च्या शूट दरम्यानचा त्याचा फोटो शेअर करत लिहिले की, झिम्मा २ मधला तानिया आणि निर्मलाचा जो बेडरूम मधला भांडणाचा वन शॅाट प्रसंग आहे, त्यावेळी त्या खोलीत एका कोपऱ्यात आपली जागा पकडून बसलेला मी… कॅमेरात दिसू नये म्हणुन एका लाल बॅगच्या मागे लपुन बसलो होतो!

त्याने पुढे म्हटले की, ६ पानांचा आणि ६ मिनिटांचा सलग वन शॅाट करायला आम्हाला तर बाई एवढी मज्जा आली, एवढी मज्जा आली की एवढी मज्जा कधी कोणाला आलीच नसेल! माझा मित्र @satyajeet_shobha_shriram आणि संपूर्ण टिमच्या मेहनती शिवाय ही मज्जा येणं शक्य नव्हतं! त्यामुळे माझ्या संपुर्ण टिमचे खूप आभार! निर्मिती सावंत आणि रिंकू राजगुरू. तुम्हाला आठवतोय का हा सीन? कसा वाटला?

'झिम्मा २'बद्दल...
२०२१ साली प्रदर्शित झालेल्या 'झिम्मा' या चित्रपटाचा 'झिम्मा २' सीक्वल आहे. सात बायकांच्या रियुनियनची धमाल गोष्ट या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. यात सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, निर्मिती सावंत, क्षिती जोग, सायली संजीव, शिवानी सुर्वे, रिंकू राजगुरू आणि सिद्धार्थ चांदेकर हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

Web Title: During the shooting of this scene in 'jhimma 2' Hemant Dhome was sitting hiding behind a bag, read this interesting story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.