डॉ. तात्याराव लहानेमध्ये पाहायला मिळणार आई मुलाच्या नात्याची हृदयस्पर्शी कथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2017 10:36 IST2017-07-20T05:06:34+5:302017-07-20T10:36:34+5:30

डॉ. तात्याराव लहाने यांच्या संघर्षात्मक जीवनावर दृष्टिक्षेप टाकणारा डॉ. तात्या लहाने... अंगार पॉवर इज विदीन हा सिनेमा ६ ऑक्टोबर ...

Dr. Heartbroken story of mother-son's relationship will be seen in Tatyarao Halla | डॉ. तात्याराव लहानेमध्ये पाहायला मिळणार आई मुलाच्या नात्याची हृदयस्पर्शी कथा

डॉ. तात्याराव लहानेमध्ये पाहायला मिळणार आई मुलाच्या नात्याची हृदयस्पर्शी कथा

. तात्याराव लहाने यांच्या संघर्षात्मक जीवनावर दृष्टिक्षेप टाकणारा डॉ. तात्या लहाने... अंगार पॉवर इज विदीन हा सिनेमा ६ ऑक्टोबर २०१७ला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या सिनेमाच्या माध्यमातून डॉ. लहाने यांची निव्वळ बायोपिक सादर केली नसून त्यांच्या आयुष्याची कथा हा सिनेमा पाहणारी प्रत्येक व्यक्ती स्वतः अनुभवेल अशी आहे. नामवंत कलाकारांचा कसदार अभिनय आणि डॉ. लहाने यांचे आयुष्य पालटवणारा क्षण हृदय हेलावून टाकणारा आहे. सिनेमात डॉ. लहाने यांची भूमिका अभिनेता मकरंद अनासपुरेने तर त्यांच्या आईची भूमिका अभिनेत्री अलका कुबलने साकारली आहे. दोन्ही किडन्या निकामी झाल्यामुळे मृत्यूच्या दाराशी उभ्या असलेल्या आपल्या मुलाला स्वतःची किडनी देऊन पुन्हा नवा जन्म देणारी डॉक्टरांची आई अंजनाबाई यांच्या भूमिकेतून अलका कुबल यांचा अभिनय पाहण्याची संधी बऱ्याच दिवसांनी प्रेक्षकांना मिळणार आहे. आई-मुलाची ही हृदयस्पर्शी सत्य घटना खूप प्रेरक आहे. डॉ. लहाने यांना पुनःजन्म देणारी त्यांची आई ही त्यांच्या आयुष्यातील मोठे प्रेरणास्थान आहे. डॉ. तात्या लहाने... अंगार पॉवर इज विदीन या सिनेमाचे दिग्दर्शन विराग मधुमालती वानखडे यांनी केले असून त्यांच्याच चक दे प्रॉडक्शन अंतर्गत सिनेमाची निर्मिती केली आहे. मकरंद अनासपुरे आणि अलका कुबल यांच्यासोबत सिनेमात निशिगंधा वाड, भारत गणेशपुरे, रमेश देव यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
डॉ. तात्याराव लहाने या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून या चित्रपटाबाबत प्रेक्षकांच्या मनात चांगलीच उत्सुकता आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडेल अशी या चित्रपटाच्या टीमला खात्री आहे. 

Also Read : अलका कुबल यांची लेक घेणार उत्तुंग भरारी!

Web Title: Dr. Heartbroken story of mother-son's relationship will be seen in Tatyarao Halla