कसली भारी दिसत्येय 'सैराट'मधील परश्याचा मित्र 'लंगड्या'ची गर्लफ्रेंड, सौंदर्यात नायिकांनाही देते टक्कर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 13:35 IST2025-06-24T13:34:57+5:302025-06-24T13:35:52+5:30
Tanaji Galgunde :'सैराट' चित्रपटात लंगड्याची भूमिका अभिनेता तानाजी गळगुंडेने साकारली होती. तो अलिकडेच त्याच्या गर्लफ्रेंडमुळे चर्चेत आला होता. त्याची गर्लफ्रेंड सौंदर्यात अभिनेत्रींनाही टक्कर देते.

कसली भारी दिसत्येय 'सैराट'मधील परश्याचा मित्र 'लंगड्या'ची गर्लफ्रेंड, सौंदर्यात नायिकांनाही देते टक्कर!
२०१६ साली सैराट (Sairat Movie) हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला. या चित्रपटाने इतिहास घडवला. या चित्रपटाती आर्ची आणि परश्याच्या लव्हस्टोरीने रसिकांच्या मनात घर केले. त्याचबरोबर परश्याचे मित्र सल्या आणि लंगड्याने देखील प्रेक्षकांची मने जिंकली. चित्रपट रिलीज होऊन जवळपास १० वर्षे झाले आहेत तरीदेखील यातील कलाकार सिनेरसिकांच्या मनात घर करून कायम आहेत. या चित्रपटात लंगड्याची भूमिका अभिनेता तानाजी गळगुंडे(Tanaji Galgunde)ने साकारली होती. तो अलिकडेच त्याच्या गर्लफ्रेंडमुळे चर्चेत आला होता. त्याची गर्लफ्रेंड सौंदर्यात अभिनेत्रींनाही टक्कर देते. चला तर मग जाणून घेऊयात, त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल.
अभिनेता तानाजी गळगुंडेच्या गर्लफ्रेंडचं नाव आहे प्रतीक्षा शेट्टी. ती एक मॉडेल आणि उद्योजिका आहे. तानाजी गेल्या ५-६ वर्षे प्रतीक्षा शेट्टीसोबत रिलेशनशीपमध्ये आहे. नव्या वर्षाची सुरुवात तानाजीने गर्लफ्रेंडचे नाव जाहीर करत केली होती. प्रतीक्षा शेट्टी पुण्यात वास्तव्यास आहे आणि तिचा सोप स्पर्श या नावाने हँडमेड साबणांचा व्यवसाय आहे.
तानाजी आणि प्रतीक्षा गेल्या ५-६ वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये आहे. तानाजीच्या ऑपरेशनच्या काळात प्रतीक्षाने त्याची विशेष काळजी घेतली होती. प्रतीक्षा वेगळ्या जातीतली असल्यामुळे सुरुवातीला तानाजीच्या आईने त्यांच्या नात्याला विरोध केला होता. मात्र, कालांतराने तानाजीने आपल्या आईला समजावून सांगितल्यानंतर त्यांनी त्यांचे नाते स्वीकारले. आता ते दोघे लग्नगाठ कधी बांधणार, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.