'माझं घर माझा संसार' सिनेमातील ही अभिनेत्री आठवतेय का?, वयाच्या ३१व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 07:00 IST2021-10-08T07:00:00+5:302021-10-08T07:00:00+5:30

'माझं घर माझा संसार' सिनेमातील 'दृष्ट लागण्या जोगे सारे' हे गाणे खूप लोकप्रिय ठरले होते.

Do you remember this actress from the movie 'Maza Ghar Maza Sansaar'? She said goodbye to the world at the age of 31 | 'माझं घर माझा संसार' सिनेमातील ही अभिनेत्री आठवतेय का?, वयाच्या ३१व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

'माझं घर माझा संसार' सिनेमातील ही अभिनेत्री आठवतेय का?, वयाच्या ३१व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

'दृष्ट लागण्या जोगे सारे' हे गाणे आजही अनेकांच्या ओठावर रुळताना दिसते. हे गाणे आठवले की, डोळ्यासमोर येतात ती ट्रेनमधील ते नवे जोडपे. नव्या संसाराच्या स्वप्न उराशी बाळगून प्रवास करतात. १९८६ साली 'माझं घर माझा संसार' सिनेमा प्रदर्शित झाला. या चित्रपटात अजिंक्य देवसोबत अभिनेत्री मुग्धा चिटणीस मुख्य भूमिकेत होती.

अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकरांनी गायलेली या सिनेमातील गाणी आजही लोकांच्या फेव्हरेट प्ले लिस्टमध्ये आपले स्थान कायम आहेत. या चित्रपटात अजिंक्य देवच्या आईची भूमिका दिवगंत अभिनेत्री रीमा लागू यांनी साकारली होती. सासू आणि सुनेचे नाते साकारणाऱ्या या दोघींनी तेव्हाच्या परिस्थितीचा आढावा समोर मांडला होता. विशेष बाब म्हणजे मुग्धा चिटणीस या अभिनेत्री साकारलेला हा एकमेव सिनेमा आहे. 

तुम्हाला वाचून धक्का बसेल पण या अभिनेत्रीने वयाच्या ३१ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. ५ डिसेंबर १९९४ साली तिला कॅन्सरचे निदान झाले आणि १० एप्रिल १९९६ साली या अभिनेत्रीचे कॅन्सरसारख्या गंभीर आजारामुळे निधन झाले.मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुग्धा केवळ अभिनेत्री नव्हती तर ती उत्कृष्ट कथा-कथनकारही होती. भारत आणि अमेरिकेत त्यांनी कथाकथन शैलीत ५०० कार्यक्रम सादर केले होते. मुंबईतील ‘ऑल इंडिया रेडिओ’मध्ये पुष्कळ कार्यक्रम सादर केले. १८ फेब्रुवारी १९६५ साली तिचा जन्म झाला होता. मुग्धा चिटणीस उमेश घोडके यांच्याशी लग्न झाले होते. कॅन्सरने मृत्यू झाला तेव्हा मुलगी ईशा अवघ्या ५ वर्षाची होती.


मुग्धाच्या मृत्यूनंतर मुलगी ईशा आपले आजी आजोबा अशोक आणि शुभा चिटणीस यांच्यासोबत मुंबईत राहिली. उमेश घोडके यांनी ईशाला आई आणि वडील असे दोघांचे प्रेम दिले. शिक्षणासाठी त्यांनी तिला अमेरिकेत पाठवले. ईशाने अमेरिकेत कायदे विभागात प्रमुख पदावर काम केले. न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमधून जर्मन भाषा आणि पत्रकारितेची पदवी मिळवली. 

Web Title: Do you remember this actress from the movie 'Maza Ghar Maza Sansaar'? She said goodbye to the world at the age of 31