हिला ओळखलंत का ? काही वर्षांपूर्वी अशी दिसायची प्रार्थना बेहरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 17:02 IST2021-04-05T17:02:11+5:302021-04-05T17:02:51+5:30

प्रार्थना बेहरेने सोशल मीडियावर जुना फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे.

Do you recognise her? A few years ago, Prathana Behere looking like this | हिला ओळखलंत का ? काही वर्षांपूर्वी अशी दिसायची प्रार्थना बेहरे

हिला ओळखलंत का ? काही वर्षांपूर्वी अशी दिसायची प्रार्थना बेहरे

प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. ती सोशल मीडियावर फोटो व व्हिडिओ शेअर करत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती देत असते. प्रार्थना आपल्या वेगवेगळ्या फोटोशूटला घेऊन सोशल मीडियावर अलीकडे चर्चेत असते. मात्र यावेळेस तिने जुना फोटो शेअर केला आहे. हा फोटो तिच्या हिंदी मालिकेतील आहे. ही मालिका म्हणजे पवित्र रिश्ता. या मालिकेतून तिने हिंदी छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. या मालिकेत तिने वैशाली ही भूमिका साकारली होती.

प्रार्थना बेहरे हिने तिच्या पहिल्या मालिकेतील फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. तिने लिहिले की, एक जुना फोटो..हजार जुन्या आठवणी...


प्रार्थनाचा हा फोटो पवित्र रिश्ता मालिकेतील आहे. या मालिकेत तिने वैशालीची भूमिका साकारली होती. या मालिकेत तिच्यासोबत अंकिता लोखंडे, सुशांत सिंग राजपुत, प्रिया मराठे, उषा नाडकर्णी हे कलाकार मुख्य भूमिकेत होते.

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर प्रार्थना लवकरच छूमंतर या मराठी सिनेमात दिसणार आहे.यात तिच्यासोबत रिंकू राजगुरू, सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमाच्या काही सीन्सचे शूटिंग लंडनमध्ये झाले आहे. त्याचबरोबर ती एका हिंदी बेवसीरिजमध्ये देखील दिसणार आहे.

प्रार्थनाने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरुन म्हणजेच 'पवित्र रिश्ता' मालिकेतून केली.'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा' या मराठी सिनेमातून एंट्री मारत रसिकांची मनं जिंकली.कॉफी आणि बरंच काही, मिस्टर एंड मिसेस सदाचारी, मितवा, मस्का अशा विविध मराठी सिनेमात काम केलं आहे.

Web Title: Do you recognise her? A few years ago, Prathana Behere looking like this