फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का?, आता आहे मराठी सिनेइंडस्ट्रीत आघाडीची अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2023 11:05 IST2023-06-03T11:05:15+5:302023-06-03T11:05:55+5:30

या अभिनेत्रीने मराठीसह हिंदी सिनेइंडस्ट्रीतही काम केले आहे.

Do you know this little girl on her mother's side? Now she is a leading actress in the Marathi cine industry. | फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का?, आता आहे मराठी सिनेइंडस्ट्रीत आघाडीची अभिनेत्री

फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का?, आता आहे मराठी सिनेइंडस्ट्रीत आघाडीची अभिनेत्री

कलाकारांचा खूप मोठा चाहता वर्ग असतो आणि त्यांचे अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. बऱ्याचदा कलाकार आपल्या बालपणीचे फोटो आणि आठवणी शेअर करत असतात. या फोटोंना चाहत्यांची पसंतीदेखील मिळताना दिसते. या फोटोतील चिमुकलीला तुम्ही ओळखलंत का? नाही ना. ही दुसरी तिसरी कुणी नसून सर्वांची लाडकी आर्ची उर्फ रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) आहे.  आज अभिनेत्री रिंकू राजगुरु २१ वा वाढदिवस साजरा करते आहे. वाढदिवसानिमित्त रिंकूच्या आईने तिच्या बालपणीसोबतचा आताचा फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

रिंकू राजगुरूची आई आशा राजगुरू यांनी इंस्टाग्रामवर रिंकूच्या बालपणीचा आणि आताचा कोलाज फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत लिहिले की, तू चमकणारा तारा आहेस आणि मी भाग्यवान आहे की मी तुझ्या तेजाचा आनंद घेऊ शकले. माझ्या लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तू फक्त माझी मुलगीच नाही तर माझी सर्वात चांगली मैत्रीणही आहेस, आपण एकत्र घालवलेला प्रत्येक क्षण मला खूप आवडतो, तुझी आठवण येते. या पोस्टला चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसते आहे.

दरम्यान, सैराटमुळे कलाविश्वात पदार्पण करणाऱ्या रिंकू राजगुरूने कागर, मेकअप अशा काही मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे. तर, ओटीटीवरही तिने पदार्पण केले असून वेबसीरिजमध्येही काम केलं आहे. 

आगामी प्रोजेक्ट

रिंकू राजगुरूच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर ती लवकरच छुमंतर या मराठी चित्रपटात झळकणार आहे. तिच्यासोबत या चित्रपटात प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी आणि रिषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे लंडनमध्ये शूटिंग पार पडले.

 

Web Title: Do you know this little girl on her mother's side? Now she is a leading actress in the Marathi cine industry.