"डिस्को सन्या" चे चिंगाबुंगा अपेक्षा वाढवणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2016 16:05 IST2016-07-08T10:35:36+5:302016-07-08T16:05:36+5:30
" सैराट च्या यशानंतर चित्रपटप्रेमींच्या अपेक्षा एका उंचीवर जाऊन पोह्चल्यात हे नक्की. सैराट च्या यशाचं मूळ हे नक्कीच त्यातील ...

"डिस्को सन्या" चे चिंगाबुंगा अपेक्षा वाढवणार
सैराट च्या यशानंतर चित्रपटप्रेमींच्या अपेक्षा एका उंचीवर जाऊन पोह्चल्यात हे नक्की. सैराट च्या यशाचं मूळ हे नक्कीच त्यातील गाणी आणि अजय अतुल चे संगीत हे होतं यात शंका नाही. संपूर्ण महाराष्ट्रभर चित्रपटगृहांत या गाण्यांवर लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांचेच पाय थिरकत होते. सैराट नंतर आलेले अनेक मराठी चित्रपट आले आणि गेले पण सैराटचे हँगओव्हर काही उतरेना पण आता तोडीस तोड म्युझीक घेऊन येत्या ५ ऑगस्ट रोजी येतोय "डिस्को सन्या".
सध्या प्रथम पदार्पणातच सुपरहिट होणाऱ्या चित्रपट आणि गाण्यांचे प्रमाण वाढले आहे. "डिस्को सन्या" या चित्रपटाच्या अनेक गोष्टी चित्रपट सृष्टीत प्रथम पदार्पण असलेल्या पण एक से बढकर एक अशा अव्वल कालकारांकडून साकारल्या गेल्या आहेत.
महत्वाचं म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शन नियाज मुजावर या एफ टी आय मधून शिकून बाहेर पडलेल्या एक हुशार, संयमी आणि महत्वाकांक्षी दिग्दर्शकाने केले आहे. नियाज यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. यांच्या या नाविन्यपूर्ण दिग्दर्शनाची झलक नुकत्याच लौंच झालेल्या ट्रेलर मधून पाहायला मिळतेच.
चित्रपटाच्या गाण्यांनी तर कमालाच केलीये. अभिजीत कवठाळकर आणि सचिन पुरोहित या अफलातून जोडीने अफलातून असं संगीत दिलय. यातील सर्वच गाणी एक से बढकर एक झालीयेत. यंदाचा गणेश महोत्सव या गाण्यांनी दणाणून जाणार यात शंका नाही.
ईद च्या सुंदर मुहूर्तावर यातील एका लाजवाब गाण्याचे कौतुक करावेसे वाटते.
"काय कसली शेंडी अन काय कसली दाढी
काय कसला भगवा अन्न काय कसला हिरवा
माणुसकी हाच धर्म सून रे मेरे बेटा
विठ्ठला विठ्ठला जय हरी विठ्ठला
अल्ला हुं अकबर..अल्ला हू अल्ला हू"
संगीतकारांनी या सुंदर संदेश देणाऱ्या गाण्याची हिंदीतले शबाब साबरी आणि नंदेश उमप यांच्यात सुरेख जुगलबंदी घडवून आणली आहे. हे शब्द आहेत याच चित्रपटाच्या दिग्दर्शकांचे अर्थात नियाज मुजावर यांचे. या गाण्याचे बोल अन् नियाज मुजावर आणि गायक शबाब साबरी ही नावं, खरंतर खास गणित इथेच जुळलंय.
रिषभ पुरोहित या नवीन गायकाने पहिल्यांदाच चित्रपटासाठी गाण गायलंय आणि त्या गाण्याचे विनोदी बोल म्हणजेच चिंगा ...बुंगा ...बुंगा... डिस्को चिंगाबुंगा. प्रथम पदार्पणातच रिषभ पुरोहित हे आपल्या तालावर लहान मोठ्यांना नाचवणार हे गाणं ऐकल्यावरच लक्षात येतं. चित्रपटाचे टायटल सोंग आपल्या खास शैलीत गायलंय अवधूत गुप्ते यांनी तसेच आपल्या पहाडी आवाजात आदर्श शिंदे यांनी देखील एक खास गाणं पेश केलंय.
त्यामुळे हा चित्रपट आणि चित्रपटाचे संगीत पुन्हा एकदा चित्रपट प्रेमींच्या अपेक्षा उंचावणार यात वादच नाही.