डिस्को सन्याचा लकी बुधवार-गुरुवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2016 14:31 IST2016-08-09T09:01:33+5:302016-08-09T14:31:33+5:30

        टॉम अँड जेरीचा रोमांचकारी खेळ व खुसखुशीत संवादाने ताजेतवाने करणारे विनोद याचा संगम डिस्को सन्या ...

Disco celebrate Lucky Wednesday-Thursday | डिस्को सन्याचा लकी बुधवार-गुरुवार

डिस्को सन्याचा लकी बुधवार-गुरुवार


/>        टॉम अँड जेरीचा रोमांचकारी खेळ व खुसखुशीत संवादाने ताजेतवाने करणारे विनोद याचा संगम डिस्को सन्या या चित्रपटात पहायला मिळतो. दोन तास प्रेक्षकांना निव्वळ मनोरंजन देण्याचा प्रयत्न करणारा डिस्को सन्या हा चित्रपट प्रेक्षकांच्या जास्तच पसंतीस उतरताना दिसून येत आहे.  नवनवीन उपक्रम व कल्पक युक्त्या, आकर्षक बक्षिसांची लयलूट ... उद्देश मात्र एकच प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन!. म्हणूनच चित्रपटगृहात पुणेकरांना भरभरून हसताना पाहण्यासाठी डिस्को सन्या म्हणजेच वंडर किड पार्थ भालेराव हा  बुधवार आणि गुरुवार या दोन्ही दिवशी पुण्यातील कोणत्याही दोन थिएटरमध्ये प्रत्यक्ष प्रेक्षकांसोबत बसून चित्रपट पाहणार आहे. पार्थ भालेराव सारखा बालकलाकार चित्रपटात काम करतोय म्हटल्यावर हजारो प्रेक्षक त्यालाच बघायला सिनेमागृहात आले आणि अजूनही येताहेत. पार्थसाठी आलेला प्रत्येक प्रेक्षक बाहेर पडताना जगण्याची नवी उमेद तर घेऊन बाहेर पडतोच, पण  बुधवारी आणि गुरुवारी काही लकी पुणेकर मात्र एक सरप्राईज गिफ्ट म्हणून मोबाइल घेऊन जाणार आहेत. कारण पार्थ या दोन्ही दिवशी काही लकी सीट नंबर निवडून त्या सीट वरील प्रेक्षकाला मोबाईल गिफ्ट देणार आहे. त्यामूळे पुणेकरांनो बुधवार व गुरुवार या दिवशी सिनेमागृहात जाऊन डिस्को सन्या पहा आणि पार्थकडून आकर्षक गिफ्ट मिळविण्याची संधी मिळवा. 

Web Title: Disco celebrate Lucky Wednesday-Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.