परेश मोकाशी दिग्दर्शित चि. व चि. सौ. कां.१९ मे ला प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2017 17:50 IST2017-05-04T12:20:25+5:302017-05-04T17:50:25+5:30

‘एलिझाबेथ एकादशी’ ह्या राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपटानंतर , राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक परेश मोकाशी आणि लेखिका मधुगंधा कुलकर्णी ही ...

Directed by Paresh Mokashi And chi. Hundred Meet the audience on May 19th | परेश मोकाशी दिग्दर्शित चि. व चि. सौ. कां.१९ मे ला प्रेक्षकांच्या भेटीला

परेश मोकाशी दिग्दर्शित चि. व चि. सौ. कां.१९ मे ला प्रेक्षकांच्या भेटीला

लिझाबेथ एकादशी’ ह्या राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपटानंतर , राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक परेश मोकाशी आणि लेखिका मधुगंधा कुलकर्णी ही त्रयी पुन्हा एकदा चि. व चि. सौ. कां. ह्या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येण्यासाठी सज्ज झाली आहे. मोकाशी दिग्दर्शित ‘सत्यप्रकाश-सावित्रीचा हा लग्नसुडोकू’ मधुगंधा कुलकर्णीच्या लेखणीतून साकारला आहे. चित्रपटात अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री मृण्मयी गोडबोले यांच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. चि. व चि. सौ. कां. हा लग्नबंबाळ, धमाल गोतावळा तसेच सत्यप्रकाश आणि सावित्रीच्या नात्यांचे उलगडत जाणारे विविध पदर हे अतिशय खुमासदार पद्धतीने सांगणारी गोष्ट १९मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  
चित्रपटाची कथा आहे सत्यप्रकाश आणि सावित्री यांची. सावित्री ही प्राण्यांची डॉक्टर व पराकोटीची प्राणीप्रेमी तर सत्यप्रकाश हा इलेक्ट्रीकल इंजिनियर व टोकाचा पर्यावरण प्रेमी. दोघेही विचारांवर ठाम व कामात मग्न. घरच्यांचा आग्रहाला बळी पडून स्थळ पाहण्याच्या कार्यक्रमाला दोघेही मान्यता देतात व एकमेकांना पाहतात देखील. त्या दोघांच्या ओळखीचे एक जोडपे नुकतेच वेगळे झालेले असते. प्रेमात आकंठ बुडालेली ती जोडी महिन्याभरातच एकमेकांना वैतागून तुटलेली असते. त्यापासून धडा घेऊन सावित्री - सत्यप्रकाश एक विचित्र निर्णय घेतात आणि त्यांचे कुटूंबिय व मित्रांची एकच भंबेरी उडते.


 
‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला ललित प्रभाकर याचा हा पदार्पणातला चित्रपट आहे.मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी यांची कथा, पटकथा आणि संवाद असलेल्या या चित्रपटात मृण्मयी गोडबोले, ललित प्रभाकर, सुप्रिया पाठारे, प्रदीप जोशी, पुर्णिमा तळवलकर, सुनील अभ्यंकर, शर्मिष्ठा राऊत, पुष्कर लोणारकर, भारत गणेशपुरे, ज्योती सुभाष आणि सतीश आळेकर अशी कलाकारांची मांदियाळी आहे. या चित्रपटात एकूण दोन गाणी असून ती संगीतबद्ध केली आहेत नरेंद्र भिडे आणि शब्दबद्ध केली आहे परेश मोकाशी यांनी. यात ‘चि. व चि. सौ. कां.’ हे अकापेला धाटणीचे म्हणजेच गाण्यात कोणतेही वाद्य न वापरता वाद्यांचे आवाज फक्त तोंडाने काढलेले गाणे स्वानंद किरकिरे यांनी गायले आहे. 'मन हे' हे गाणं लिहिलंय स्वरबद्ध केलंय श्रेया घोषाल आणि स्वप्नील बांदोडकर यांनी. झी म्युझिकच्या द्वारे ही गाणी श्रोत्यांच्या भेटीस आली आहेत. चित्रपटासाठी कल्याणी गुगळे यांनी वेशभूषा केली आहे तर रंगभूषा संतोष गिलबिले यांनी. संकलन अभिजीत देशपांडे यांनी केलंय आणि अनमोल भावे यांनी ध्वनी संयोजन केले आहे. चित्रपट आपल्या कॅमेरात टिपून तो नयनरम्य बनवलाय ज्येष्ठ छायालेखक सुधीर पलसाने यांनी.सोशल मिडीयावर या चित्रपटाच्या दोन्ही टिझरला जोरदार प्रतिसाद मिळाला असून या चित्रपटाविषयी प्रेक्षकांची उत्सुकता वाढणार यात शंका नाही. चि. व चि. सौ. कां. हा चित्रपट प्रत्येक पिढीतील प्रेक्षकांचे मन जिंकुन घेण्यास सज्ज झालाय.

Web Title: Directed by Paresh Mokashi And chi. Hundred Meet the audience on May 19th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.