"नारायण राणेंची मिमिक्री केली आणि त्यांचा थेट कॉल आला", अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला "माझ्या पोटात गोळा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 12:39 IST2026-04-11T12:37:37+5:302026-04-11T12:39:11+5:30

राजकारणातील दिग्गज नेते नारायण राणे यांची मिमिक्री केल्यानंतर अभिनेत्याला त्यांचा थेट फोन आला; त्या क्षणाची आठवण अभिनेत्यानं सांगितली.

Digambar Naik Mimicry Of Narayan Rane Reaction Phone Call Actor Shares Memory | "नारायण राणेंची मिमिक्री केली आणि त्यांचा थेट कॉल आला", अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला "माझ्या पोटात गोळा..."

"नारायण राणेंची मिमिक्री केली आणि त्यांचा थेट कॉल आला", अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला "माझ्या पोटात गोळा..."

Narayan Rane Mimicry : महाराष्ट्रात राजकीय विनोदाची एक मोठी परंपरा आहे. कलाकारांनी बड्या राजकारण्यांची हुबेहूब मिमिक्री केल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे. मग ते दिग्गज अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांनी साकारलेले बाळासाहेब ठाकरे असोत किंवा अलीकडच्या काळात 'चला हवा येऊ द्या'मध्ये डॉ. निलेश साबळेने केलेली राज ठाकरे आणि अजित पवार यांची मिमिक्री असो; स्वतः नेत्यांनीही या कलेला नेहमीच दाद दिली आहे. असाच एक रंजक किस्सा अभिनेते दिगंबर नाईक यांच्या बाबतीत घडला होता. दिगंबर नाईक यांनी राजकारणातील दिग्गज नेते नारायण राणे यांची मिमिक्री केली आणि त्यानंतर नारायण राणे यांनी त्यांना थेट फोन केलेला. याबाबतचा किस्सा स्वतः दिंगबर नाईक यांनी सांगितला आहे.  

दिंगबर नाईक यांनी नुकतंच राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांना "कुठला प्रोजेक्ट असा होता, कुठलं नाटक, सिनेमा ,मालिका अशी होती ज्यान दिगंबर नाईक खरी ओळख दिली?" असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ते म्हणाले, "खरं सांगायचं तर मी अनेक मालिकांमध्ये काम केलं, खूप वेगवेगळ्या भूमिका केल्या. पण, मला दिगंबर नाईक म्हणून ओळख मिळाली ती 'घडलंय बिघडलंय'मुळे. तेव्हा झी गौरव सोहळ्यात मी नारायण राणेंची मिमिक्री केली होती. त्यामुळे मला आणखी लोकप्रियता मिळाली. माझ्या लोकप्रियतेत त्यांचा वाटा आहे. त्यामुळे मला लोक ओळखायला लागली".

नारायण राणे यांच्याशी असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधांवर ते म्हणाले, "नारायण राणे यांचा माझ्या आयुष्यात खूप मोठा वाटा आहे. कारण अशा वेळी एखाद्याने रागावणं किंवा दम देणं स्वाभाविक होतं, पण त्यांनी उलट माझं कौतुक केलं. त्यांनी मला माझ्या परफॉर्मन्सची सीडी पाठवायला सांगितली, ती पाहायची इच्छा व्यक्त केली. आजही माझे त्यांच्याशी खूप चांगले संबंध आहेत. त्यांनी मानसपुत्रासारखं प्रेम दिलं. एखादा माणूस गुणांशिवाय एवढा मोठा होत नाही, हे त्यांच्याकडे बघून जाणवतं".

राणे कुटुंबाशी असलेले कौटुंबिक स्नेह

केवळ नारायण राणेच नव्हे, तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाशी दिगंबर नाईक यांचे स्नेहबंध आहेत. ते पुढे म्हणाले, "निलेश राणे असो किंवा नितेश राणे, दोघांशीही माझे खूप चांगले संबंध आहेत. अगदी वहिनींशीही आमचं चांगलं बोलणं असतं. आमचं रोजचं फोनवर बोलणं नसलं तरी, जेव्हा-जेव्हा आम्ही भेटतो, तेव्हा खूप गप्पा रंगतात"

राजकीय मिमिक्रीची भीती का वाटत नाही?

राजकीय नेत्याची मिमिक्री करताना मनात भीती वाटते का? या प्रश्नावर दिगंबर नाईक ठामपणे सांगतात, "राजकीय व्यक्तींची मिमिक्री करताना मला कधीच भीती वाटली नाही. पोटात गोळा येतो असं कधी झालंच नाही. कारण माझा हेतू नेहमीच फक्त मनोरंजनाचा असतो, कोणालाही दुखावण्याचा नाही".

Web Title : मिमिक्री के बाद नारायण राणे का कॉल आया: अभिनेता दिगंबर नाइक

Web Summary : दिगंबर नाइक ने बताया कि मिमिक्री के बाद नारायण राणे ने उन्हें फोन किया। राणे ने नाइक के प्रदर्शन की सराहना की और रिकॉर्डिंग भी मांगी। नाइक राणे के परिवार के साथ घनिष्ठ संबंध बनाए रखते हैं, और उनके सहयोगी रवैये पर जोर देते हैं।

Web Title : Actor Digambar Naik recalls Narayan Rane's call after mimicry.

Web Summary : Digambar Naik shared that Narayan Rane called him after his mimicry act. Rane appreciated Naik's performance, even asking for a recording. Naik maintains a close bond with Rane's family, emphasizing their supportive relationship.